अड्याळवासीयांना दूषित पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:03 PM2018-07-22T22:03:56+5:302018-07-22T22:04:15+5:30

अड्याळ येथील मागील बऱ्याच दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा सुरु आहे. पाणी विकत घेऊन प्यायची वेळ नागरिकांवर येवून ठेपली आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते.

Distributed water supply to the Adyalwasi | अड्याळवासीयांना दूषित पाणी पुरवठा

अड्याळवासीयांना दूषित पाणी पुरवठा

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांना आर्थिक फटका : प्रशासन लक्ष देईल काय?, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, अनेकांचे आरोग्य धोक्यात

विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : अड्याळ येथील मागील बऱ्याच दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा सुरु आहे. पाणी विकत घेऊन प्यायची वेळ नागरिकांवर येवून ठेपली आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते.
अड्याळ ग्रामपंचायत मधील सरपंच तथा सदस्यगण ग्रामस्थांकरवी ठिकठिकाणी एकच समस्यांचा सामना करावा लागत आहे. तो म्हणजे दूषित पाण्याचा पुरवठा होय. विशेष म्हणजे पाणी जर दूषित येत असेल तर ते उकळून गाळून प्यावे असा उपरोधीक सल्लाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात येत असल्याने ग्रामस्थांच्या भुवया उंचावल्या आहेत. दूषित पाणी पुरवठ्याची समस्या जुनी असली तरी वर्षातून किती दिवस दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात आला याची नोंद प्रशासनाकडे नसली तरी कुठल्या ग्राहकाकडे किती पाणीपट्टी कर थकीत आहे याची मात्र तंतोतंत नोंद ग्रामपंचायतकडे आहे. मात्र दूषित पाण्याच्या पुरवठ्यावर तेच प्रशासन मुग गिळून आहे.
माहितीनुसार ज्या केंद्रातून पाण्याचा पुरवठा केला जातो त्या यंत्राची क्षमता कमी असून पाण्याचा पुरवठा दूषित होत असतो. दरवर्षी पावसाळ्यात दूषित पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. फक्त ब्लिचिंग घातल्याने पाणी शुद्ध होत नाही. त्याला उपाय तरी काय अशी उत्तरे दिली जातात.
ग्रामविकास अधिकारी तथा सरपंचाच्या मते जिल्हा परिषदेने लावून दिलेल्या आरो चा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येते. परंतु दोन रुपयात २० लिटर पाणी प्रत्येकालाच नेणे शक्य बाब नाही.
अड्याळ या गावात दूषित पाण्याची समस्या मुख्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते.
यावर कायमस्वरुपी तोडगा निघालेला नाही. ज्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र होते त्या ठिकाणची दूरवस्था पाहून प्रशासनाचा उदासीन कारभार लक्षात येतो. या समस्येकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

नदीतून येणारे पाणी पिवळसर येत आहे. ब्लिचिंग पावडर, तुरटी घातल्यानंतरही ते पाणी शुद्ध करण्यात येते. यावरही नागरिकांनी आरो चे पाणी विकत घ्यावे तसेच नदीचे पाणी पिऊ नये.
-जयश्री कुंभलकर,
सरपंच, अड्याळ.

Web Title: Distributed water supply to the Adyalwasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.