ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
या विज्ञान युगात मंडई, मेला, दंडार, नाटकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात ही लोककला जोपासली जात आहे. ग्रामीण कलावंतांना या मंडई उत्साहात झाडीपट्टी रंगभूमिका लेखक, कलावंत दिले आहेत. यातूनच झाडीपट्टी रंगभूमिची निर्मिती होवून अनेक रंगभूमी उदयास आल्या आहेत ...
जिल्ह्यात खरीप हंगामात धानाची खरेदी जोरात सुरु असून उच्च प्रतीच्या धानाला भाववाढ मिळण्याची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. त्यामुळे सध्या आधारभूत केंद्रावर निम्न प्रतीचा धानच शेतकरी विकत असल्याचे दिसत आहे. तर उच्च प्रतीचा धान मिळेल त्या भावात देश असल्याने ...
आवेष्टीत वस्तू नियम व वजनमाप नियमाचा भंग केल्या प्रकरणी येथील वैधमापन शास्त्र विभागाने जिल्ह्यातील १५ विक्रेत्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ४२ लाख रुपयांचे शुल्क वसुल करण्यात आले आहे. या कारवाईने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. ...
तुमसर व मोहाडी तालुक्यातील सीमावर्ती देव्हाडा तथा ढोरवाडा वैनगंगा नदी घाटातून सर्रास रेतीचे उत्खनन गत सहा महिन्यापासून सुरु आहे. रेती तस्करांनो आता तरी थांबा अशी वेळ आली आहे. महसूल प्रशासन मूग गिळून गप्प आहे. हा मुख्य व तितकाच संवेदनशिल प्रश्न परिसरा ...
पशूपालन हे शाश्वत उत्पन्नाचे साधन असून हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने केल्यास त्यातून स्वावलंबी होता येते. यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला पूरक म्हणून पशूपालनाचा व्यवसाय करावा, असे आवाहन आमदार डॉ.परिणय फुके यांनी केले. ...
जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाने २३ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनातील विविध समस्यांचे निराकरण न करता त्यांच्या समस्या व अडचणीत वाढ केली आहे. याला कारणीभूत शिक्षणाधिकारी माध्यमिक असल्याचे निदर्शनात येत असल्याने १२ डिसेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर सा ...
मोहाडी-तुमसर तालुक्याच्या सिमेवर गोंदिया राज्यमार्गावरील वैनगंगेच्या पवित्र पात्रात वसलेल्या प्रभू नृसिंहांच्या पावनधाम तिर्थक्षेत्र माडगी येथे यात्रेला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात हे तिर्थक्षेत्र मीनी पंढरी व विदर्भाची काशी म्हणूनही ओळखले जाते. ...
जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात शासकीय कामासाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना रांगेत उभे न ठेवता त्यांची कामे प्रथम प्राधान्याने करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी येथे केले. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्या साधून जिल्हाधिकारी कार्यालयात सो ...
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी येथील उड्डाणपुलाचे बांधकाम नियंत्रणाविना सुरू असल्याचे दिसत आहे. उड्डाणपूल पोचमार्ग अत्यंत धोकादायक स्थितीत असूनही संबंधित विभाग व कंत्राटदाराचे येथे कायम दुर्लक्ष दिसत आहे. ...
कोट्यवधी रूपयांची मौल्यवान रेती मॅग्नीज खाणीत भराव म्हणून गत ७० वर्षांपासून वापरील जात आहे. लाखो ब्रास रेती कायमस्वरूपी भूगर्भात गाडली जात आहे. तुमसर तालुक्यातील चिखला भूमिगत मॅग्नीज खाणीत बावनथडी नदीपात्रातून रेती आणून त्याचा भराव केला जातो. विदेशात ...