तालुक्यातील राजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चिखली हमेशा गावातील २६ एकर जागेवर १९८२ पासून अशोक लेलँड कारखान्याने केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गत तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु आहे. रविवारला उपोष ...
गावातील मुख्य रस्त्याने रेती भरुन जाणारा ट्रॅक्टर तलाठी सांगोळे यांनी भर रस्त्यात पकडला. पंचनाम्याची कारवाई करीत असतांना ट्रॅक्टर रोडच्या कडेला उभे करण्याच्या बहाणा करुन चालकाने ट्रॅक्टरच पळवीला असल्याची धक्कादायक घटना दिघोरी येथे आज दुपारी २ वाजताच् ...
जिल्ह्यात आठवड्याभरानंतर पुन्हा अवकाळी पावसाने रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील पाच तालुक्यात पाऊस बरसल्याची माहिती असून या पावसामुळे रबी पिकांना मोठा फटका बसला आहे. ...
पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा अशी पद्धत होती. मात्र यावर्षीपासून भरती प्रक्रियेत बदल झाला असून आधी लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल. यात उत्तीर्ण उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविण्यात येणार ...
जनसामान्यात पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी आपण स्वत: लोकांना भेटणार. त्यांच्या समस्या ऐकून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करणार. पोलीस खात्याला लोकाभिमुख करण्याचा आपला प्रयत्न आहे. अधिनस्त पोलिसांचे मनोबल उंचावून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार, असे प्रतिप ...
सध्या जिल्हाभर बेटी बचाव, बेटी पढाव या केंद्र सरकारच्या न असलेल्या योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार होत आहे. यात ग्रामीण भागातील नव्हे तर शहरी भागातील सुशिक्षित नागरिकही बळी पडत आहेत. ...
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या भरीव मानधनवाढ व इतर मागण्यांसाठी शिवकुमार गणवीर, हिवराज उके व माधवराव बांते यांच्या नेतृत्वात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. मागण्याचे निवेदन अधिकाऱ्यांना सोपविल्यानंतर मोर्च्याची रितसर सां ...
रेती माफिया वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यावर ट्रक चालवायला घाबरत नाही. घटनेचे गांभिर्य लक्षात घेतले जावे. जोखीम पत्करु नका. कुटूबाची काळजी घ्या. सिंघम बनणारे अधिकारी टिकत नसतात, असे भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांनी सांगितले. ...
भगतसिंग वॉर्डातील हटविण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करण्याच्या मागणीसाठी माळी समाज बांधव व विविध संघटनांच्यावतीने शुक्रवारी येथील जिल्हा कचेरीवर मोर्चा धडकला. या मोर्चात शेकडोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. ...
सागवान फर्निचर जप्त प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी वीस हजार रूपयाची लाच घेणाऱ्या वनक्षेत्र सहायकाला भंडारा येथील विशेष न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. तीन वर्षापुर्वी नाकाडोंगरी वनउपज नाक्यावर लाच स्विकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले हो ...