भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत मोठमोठाली आश्वासने दिली होती. जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र पाच वर्षात सर्वच आघाड्यांवर भाजपा सरकार अपयशी झाले. बेरोजगारी, सिंचन, धान उत्पादकांच्या प्रश्नांसह विविध प्रश्न कायम आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जनता योग ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या वाढल्याचे २००९ आणि २०१४ या वर्षाच्या आकडेवारीवर नजर घातल्यास दिसून येते. त्यावेळी दोन्ही जिल्ह्यांमिळून एकूण मतदार संख्या १६.३० लाखांच्या वर गेली होती. आता त्यात चांगलीच वाढ झाली आहे. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे नाना पंचबुद्धे, भाजपा-शिवसेना युतीचे सुनील मेंढे, बसपाच्या विजया नंदुरकर यांच्यासह ३३ उमेदवारांनी सोमवारी आपले नामांकन दाखल केले. राष्ट्रवादी आणि भाजपाने रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. ...
राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील इतर मार्गावरून होणाऱ्या जनावर तस्करी विरूद्ध पोलिसांनी मोहीम उघडली आहे. एकाच दिवशी विविध वाहनांमधून २७ जनावरांची सुटका करण्यात आली. तब्बल २७ लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे श ...
मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होवून तीन महिन्यांचा कार्यकाळ लोटला तरी रस्ता रूंदीकरणात भरावाची कामे अजुनपर्यंत पूर्ण झाली नाही. सदर रस्त्यांची संथगतीने सुरू असून मुरूम व रेतीची कमतरता हे एक प्रमुख कारण असल्याचे समजते. मुरूमाची लीज न मिळ ...
कोका अभयारण्यातील रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या झाडांना खिळे ठोकून सुमारे ४०० सूचना फलक लावण्यात आले होते. वन्यजीवांच्या भ्रमंती मार्गावर व चराई क्षेत्रात पर्यटकांना खिळे पडलेले आढळून आल्याने वन्यप्राण्यांच्या जिवीतास धोका संभवत असल्याचे वृत्त प्रकाशित ...
भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघात उमेदवाराच्या नावावरुन गत महिन्याभरापासून सुरु असलेल्या तर्कवितर्कांना भाजपाने रविवारी पुर्णविराम दिला. नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी घोषीत केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव रविवारी सायंकाळपर्यंत गुलदस्त्या ...
येथून १० कि.मी. अंतरावरील सोनी (चप्राड) बसस्थानकावर साकोली वरून चंद्रपुरला जाणाऱ्या बसमधून २५ हजार ८७० रुपए किंमतीच्या देशी दारूची वाहतुक करणाऱ्या एका महिला व एका पुरूषास स्थिर सर्वेक्षण पथकाकडून रंगेहात पडण्यात आल्याची घटना रविवारला (ता.२४) रोजी सका ...