तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील ६७९ गावे पाणी टंचाईच्या छायेत असून पाणी टंचाई निवारणार्थ १५५५ उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. १२ कोटी ५८ लाख ८ हजार रुपयांच्या विविध उपाययोजना प्रस्तावित असल्या तरी गाव खेड्यातील नागरिकां ...
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेल्या साध्वी प्रज्ञासिंहचा येथील पोलीस बॉईज असोसिएसनने तीव्र शब्दात निषेध दर्शविला. यासंबधीचे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षकांना देण्यात आले. ...
देशाची जीवनवाहिनी रेल्वे असे ब्रिदवाक्य आहे. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे तुमसर टाऊन रेल्वे स्थानकात प्रवाशांना २१ व्या शतकात भर उन्हात झाडाखाली रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकाची येथे दुरवस्था झाली आहे. ...
मोठा गाजावाजा करुन पवनी येथे जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या डिजीटल पब्लिक स्कुलची इमारत आता मोडकळीस आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुर्वीची जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेची इमारत पवनीचे वैभव असून हा वारसा जतन करण् ...
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फ्रंट जिजस पब्लिक स्कूल मधील अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची सीबीआय चौकशी करून आरोपींना फाशी देण्याची मागणी एका निवेदनातून आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण् ...
येथील नळयोजनेला ४७ वर्ष पूर्ण झालेले असून संपूर्ण नळयोजना कालबाह्य झालेलीे आहे. त्यामुळेच मोहाडीत पाणीसमस्येने विक्राळ रुप धारण केलेले आहे. जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ...
आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन केले असून यंदा १ लाख ९२ हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार आहे. त्यासाठी ४५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली असून ८६ हजार क्विंटल खतांचे आवंटन प्राप्त झाले आहे. ...
केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयातर्फे राज्यातील भंडारा व अमरावती या दोनच जिल्ह्यांसाठी सुरू केलेल्या इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेला हरताळ फासला जात आहे. ...
तालुक्यातील मडेघाट येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून त्यातच दहा दिवसांपासून नळ योजना बंद आहे. परिणामी त्रस्त झालेल्या महिलांनी सोमवारी लाखनी तहसीलवर घागर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. डोक्यावर पाण्याचे हंडे घेवून महिला मोर्चात सहभागी झाल्या ...
केंद्र तथा राज्य शासनाने कारखानदारीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र एमआयडीसीला परवानगी दिली. तुमसर येथे ३० वर्षापुर्वी गोंदिया महामार्गावर देव्हाडी शिवारात एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. अडीच एकरात असलेल्या या एमआयडीसीत मुलभूत सो ...