शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

उघड्यावरील धान ओलेचिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 6:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अवकाळी पावसाने आधारभूत खरेदी केंद्रावरील उघड्यावर असलेले शेतकऱ्यांच्या धानाची हजारो पोती ओलेचिंब झाली आहेत. ...

ठळक मुद्देजिल्ह्यात अवकाळी पाऊस : आधारभूत खरेदी केंद्रावरील प्रकार, शेतकऱ्यांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अवकाळी पावसाने आधारभूत खरेदी केंद्रावरील उघड्यावर असलेले शेतकऱ्यांच्या धानाची हजारो पोती ओलेचिंब झाली आहेत. गत महिन्याभरापासून विक्रीच्या प्रतीक्षेत असलेली धानाची पोती उघड्यावरच असून ढगाळ वातावरणानंतरही कोणतीच उपाययोजना केली नाही. ओला झालेला धान खरेदी केला जाणार नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून अवकाळी पावसाला प्रारंभ झाला. गुरुवारी सकाळी जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखांदूर, लाखनी, पवनी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसात जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला मोठा फटका बसला. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती तथा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेली हजारो पोती पावसात ओली झाली. काही ठिकाणी प्लास्टिक ताडपत्री झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात धानाची हजारों पोती ओली झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षी अवकाळी पाऊस बरसतो परंतु बाजारसमिती शेड तयार करीत नाही. पुर्व विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारसमिती असतांनाही शेतकऱ्यांना माल मात्र येथे उघड्यावरच असतो. नाकाडोंगरी धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धान ओला झाल्याने शेतकऱ्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाई देण्याची मागणी होत आहे.लाखांदूर तालुक्यातील बारव्हा परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेकडो धानाची पोती ओलीचिंब झाली आहे. जैतपूर येथील केंद्रावर धान मोजण्यात दिरंगाई होत असून हजारों पोते उघड्यावर पडलेली आहे. धान मोजणीला उशिर झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला आहे. लाखनी तालुक्यात खरेदी-विक्री सहकारी समितीद्वारे आधारभूत धान खरेदी केली जात आहे. गोदाम हाऊसफुल झाल्याने धान खरेदी थांबली आहे. गुरुवारी पहाटे झालेल्या पावसाने लाखनी येथील उघड्यावरील धान ओला झाला. ओला झालेला धान अंकुरण्याची शक्यता आहे. धानाला आणखी दोनशे रुपये दरवाढ मिळाल्याने शेकडो शेतकऱ्यांनी येथे धान आणला होता. अशी स्थिती तालुक्यातील जेवनाळा, कनेरी, गुरढा या गावातही आहे. पालांदूर येथे गुरुवारी पहाटे पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकºयांना धान पोती झाकण्यासाठी धावपळ करावी लागली. ढगाळ हवामानामुळे कालपासूनच शेतकऱ्यांनी ताडपत्र्या झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु रात्री झालेल्या पावसाने आधारभूत केंद्रावरील धान ओला झाला.पवनी तालुक्यातील कोंढा येथील धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. गोदामाच्या कमतरतेने खरेदीची गती मंदावली आहे. परिणामी धानाचे पोते उघड्यावरच आहेत. याचा फटका गुरुवारी शेकडो शेतकऱ्यांना बसला.साकोली येथील उघड्यावरील धानालाही मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने पहाटेपासूनच हजेरी लावल्याने उघड्यावरील धान पुर्णत: ओला झाला. सकाळी शेतकऱ्यांनी केंद्राकडे धाव घेतली. धान झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत अर्धाअधिक धान ओला झालेला होता.धानपोते झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळआधारभूत केंद्रावर उघड्यावर असलेले धानाचे पोते ओले होऊ नये म्हणून ताडपत्री झाकण्यासाठी शेतकऱ्यांची दिवसभर धावपड दिसत होती. अनेक शेतकरी आपल्या घरुन ताडपत्र्या घेवून आधारभूत केंद्राकडे धाव घेत असल्याचे दिसत होते. मात्र रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचा धान ओला झाला होता. वरुन ताडपत्री झाकली असली तरी पोताखालून पाणी वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात धान ओला झाला. कोंढा येथील धान केंद्रावर शेतकऱ्यांनी ताडपत्र्या झाकल्या होत्या परंतु त्यानंतर शेतकऱ्यांना फटका बसला. वातावरण ढगाळ असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड