धान उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:13 IST2018-11-09T22:13:31+5:302018-11-09T22:13:49+5:30

सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना प्रकाशाच्या सणातही उदरनिर्वाहाच्या चिंतेने रूखरूख लागली आहे. कमी उत्पादन होऊनही ाजारात पुरेसा भाव मिळत नसल्याने ही दिवाळी अंधारात गेली आहे.

Paddy producers are in the dark on Diwali | धान उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच

धान उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना प्रकाशाच्या सणातही उदरनिर्वाहाच्या चिंतेने रूखरूख लागली आहे. कमी उत्पादन होऊनही ाजारात पुरेसा भाव मिळत नसल्याने ही दिवाळी अंधारात गेली आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे रब्बी पिकांचा पेराही कमी होण्याची भिती वर्तविण्यात येत आहे.
मागील पावसाळ्यात आॅगस्टनंतर पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शक्य तिथून पाणी मिळवून पिकाचे सिंचन करावे लागते. साकोली तालुक्यातील निम्न चुलबंद व भीमलकसा प्रकल्प अपूर्णावस्थेत असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गावर किंवा शेतातील विहीर व बोरवेलच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.
त्यामुळे यावर्षीही उत्पादन घटले आहे. संध्या हलक्या धानाची कापणी व चुरणे झाले आहे. शेतकरी हमीभाव धान खरेदी केंद्रात धानाची विक्री करीत होते. तालुक्यात जवळपास ३५ ते ४० हजार क्वींटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. यापैकी काही शेतकºयांना धानाचे चुकारे मिळाले असून बरेच शेतकºयांना चुकारे मिळालेच नाही.
भारी धानाच्या कापणीला आता सुरवात झाली आहे. मात्र शेवटी शेवटी पावसाच्या कमतरतेमुळे भारी धानाच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील तीन वर्षापासून सतत दुष्काळीसदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्याकडे जमापंूजी शिल्लक नाही. अशावेळी दिवाळीला मुलांना कपडे खरेदी करण्यास शेतकरी असमर्थ ठरला आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांनी खाजगी उसनवार केल्याचे बरीच उदाहरणे समोर आली आहेत.
वाढता कर्जबाजारीपणा
मागील तीन वर्षापासून बदलते पर्जन्यमान, किड रोगाचा प्रादूर्भाव यामुळे उत्पादन घटले आहे. मात्र शेतकऱ्यांना दरवर्षी बीबीयाने, खते, रोवणी, तांदळाचा दर वाढण्याऐवजी कमी होत आहे. त्यामुळे बाजारात तांदळाची आवक मंदावली आहे. उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी यामुळे शेतकऱ्यावर दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढतच आहे.
विम्याचा उपयोग काय
शेतकऱ्यांच्या पिकाला विमा संरक्षण देण्यासाठी कर्जाच्या रकमेतून विमा हप्त्याची कपात केली जाते. परंतु नैसर्गी आपत्ती, रोगाचा प्रादुर्भाव यामुळे पिकांचे नुकसान होऊनही अनेक शेतकºयांना विम्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे विम्याचा शेतकºयांना उपयोग काय असा प्रश्न आहे.

Web Title: Paddy producers are in the dark on Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.