शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

धानपिके नष्ट; हतबल झालेल्या शेतकऱ्याने शेतात सोडली जनावरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 11:24 IST

दांडेगाव शेतशिवारातील घटना : दोन महिने लोटूनही मदत नाही

दयाल भोवते लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : पहिल्यांदा आलेल्या पुराने लागवडीखालील धान पन्हे सडले. अन्य शेतकऱ्यांकडून पन्ह्यांची जुळवाजुळव करून धान पिकाची लागवड केली. मात्र, दुसऱ्यांदा आलेल्या पुराने तेही धान पीक नष्ट झाल्याने व शासनाकडून कुठलीही मदत न मिळाल्याने संतापलेल्या शेतकऱ्याने उभ्या धान पिकात जनावरे चारण्यासाठी सोडले. हा प्रकार लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव शेतशिवारात उघडकीस आला आहे. कुंडलिक चेपटू घाटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 

कुंडलिक यांची दांडेगाव शेतशिवारात नदीकाठावर अडीच एकर शेती आहे. खरीप हंगामात धान पिकाची लागवड करण्यासाठी कुंडलिकने पह्यांची लागवड केली होती. पन्हे लागवडीसाठी आल्यानंतर काही दिवसांत पन्ह्यांची शेतात लागवड करणार तोच पहिल्यांदा अतिवृष्टीने झोडपून काढले. चुलबंद नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली. पुरामुळे कुंडलिकच्या शेतातील संपूर्ण धान पन्हे पाण्याखाली येऊन सडले.

पूर ओसरताच कुंडलिकने परिसरातील शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या धान पन्ह्यांची जुळवाजुळव करून पुन्हा धान पिकाची लागवड केली. धान पिकाचे संगोपन करताना त्याने खते व विविध औषधांची फवारणी केली. चुलबंद नदीला आलेले पुराचे पाणी कुंडलिकच्या शेतात शिरल्याने धान पिकाचे पूर्णतः नुकसान झाले.

महसूल प्रशासनांतर्गत नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली. मात्र, तब्बल २ महिने लोटूनही कुठलीही नुकसानभरपाई न मिळाल्याने संतापलेल्या कुंडलिकने धान पिकांत गावातील शेतकऱ्यांची जनावरे चराईसाठी सोडली. कुंडलिक, त्याची पत्नी व २ मुले असा चौघांचे कुटुंब आहे. घराचा संपूर्ण आर्थिक रहाटगाडा शेतीवर अवलंबून आहे. शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

मदत मिळणार तरी केव्हाअतिवृष्टीनंतर पंचनामे करण्यात आले. पुरानंतरही तोच प्रकार पुन्हा घडला. दोनवेळा अस्मानी संकट आल्याने मदत मिळेलच, अशी आशा शेतकऱ्याला होती. मात्र दोन महिने लोटूनही मदत काही मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्याला टोकाचे पाऊल उचलावे लागते. अशीच अवस्था तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांचीही आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराCropपीकAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी