किशोरवयीन मुले, मुली व पालक वर्गासाठी वेबिनारचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:31 IST2021-03-14T04:31:04+5:302021-03-14T04:31:04+5:30

भंडारा : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून महिला दिनानिमित्त शासनाने आयोजित केलेल्या उपक्रमशील सप्ताहातील विविध उपक्रमातील एक उपक्रम ...

Organizing webinars for adolescent boys, girls and parents | किशोरवयीन मुले, मुली व पालक वर्गासाठी वेबिनारचे आयोजन

किशोरवयीन मुले, मुली व पालक वर्गासाठी वेबिनारचे आयोजन

भंडारा : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून महिला दिनानिमित्त शासनाने आयोजित केलेल्या उपक्रमशील सप्ताहातील विविध उपक्रमातील एक उपक्रम ' किशोवयीन मुलामुलींच्या समस्या' व त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्वच विषयावर तज्ज्ञ अतिथी मृणाल मुनेश्वर,महिला व बाल समुपदेशक, वैशाली सतदेवे, चाईल्डलाईन भंडारा यांच्या मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन केले गेले.

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मनोहर बारसकर यांच्या कक्षात झालेल्या बैठकीत या व्याख्यान सत्राचे नियोजन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गुगल मीट च्या माध्यमातून जिल्ह्यातील पालक,शिक्षकांसाठी या वेबिनारचे आयोजन करावे असे नियोजन केले गेले. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत या वेबिनारचे आयोजन स्थानिक लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या कक्षात केले गेले. या वेबिनार मध्ये किशोरवयीन मुलामुलींच्या समस्या, पोक्सो ॲक्ट,पालक व शिक्षकांची कर्तव्य,जबाबदाऱ्या आदी विषयावर अतिथींनी भाष्य केले .

प्रारंभी विद्यालयाच्या प्राचार्या केशर बोकडे यांनी अतिथी व्याख्यात्यांचे शाळेकडून व शिक्षण विभागाकडून गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.याप्रसंगी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामूजी शहारे उपस्थित होते. नोडल ऑफिसर म्हणून उपशिक्षणाधिकारी अर्चना भिवगडे यांनी काम पाहिले. नियोजन सहाय्यक म्हणून नितीन वाघमारे यांनी कार्य बजावले.

या वेबिनारचे संचालन स्मिता गालफाडे यांनी तर जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियानातील तंत्र सहाय्यक विरेंद्र गौतम यांनी तांत्रिक बाजू हाताळली. कार्यक्रम यशस्वी करण्यास रेखा बोरकर राऊत, परिचर राजकुमार गजभिये, वर्षा बावणकर यांनी प्रयत्न केले.

Web Title: Organizing webinars for adolescent boys, girls and parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.