पिंपळगाव येथे विविध स्पर्धांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:38 IST2021-09-25T04:38:31+5:302021-09-25T04:38:31+5:30

बक्षीस वितरणाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ महाविद्यालय लाखनीचे प्रा. डॉ. अमित गायधनी, पाहुणे म्हणून अनिल चौहान, नाशिका दिघोरे, सुरेश जीवतोडे ...

Organizing various competitions at Pimpalgaon | पिंपळगाव येथे विविध स्पर्धांचे आयोजन

पिंपळगाव येथे विविध स्पर्धांचे आयोजन

बक्षीस वितरणाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ महाविद्यालय लाखनीचे प्रा. डॉ. अमित गायधनी, पाहुणे म्हणून अनिल चौहान, नाशिका दिघोरे, सुरेश जीवतोडे उपस्थित होते. बौद्धिक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सुजान, सक्षम, निरोगी युवकाचे राष्ट्रीय विकासातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ. गायधनी यांनी स्पष्ट केले.

स्पर्धेत वक्तृत्व स्पर्धेत साही आगासे, तेजस्विनी जिवतोडे, संगीत खुर्ची स्पर्धेत रितू आगाशे, एकल नृत्य स्पर्धेत सुयोग रामटेके, हार स्पर्धेत मनीस मसराम, हांडी फोड स्पर्धेत पूनम बावणे, संगीत खुर्ची स्पर्धेत अक्षय बावने, सुई धागा स्पर्धेत हिमानी लांडगे, रनिंग स्पर्धेत जानव्ही बेहरे, पोता दौड स्पर्धेत रक्षा सोनटक्के, रांगोळी स्पर्धेत विक्की भेंडारकर यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमासाठी अश्विन दिघोरे, अजित जीवतोडे, सिकंदर राहुत, आशिष दिघोरे, अमित जिवतोडे, अमोल जीवतोडे, विकास सावरकर, रजत मेश्राम यांनी सहकार्य केले.

240921\img-20210919-wa0108.jpg

photo

Web Title: Organizing various competitions at Pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.