शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

मौल्यवान वृक्षांची खुलेआम कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 6:00 AM

पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. वैनगंगासह तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात विपूल वनसंपदा आहे. याशिवाय नागझिरा अभयारण्य, उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्प याशिवाय अनेक राखीव जंगल व जंगलव्याप्त वने आहेत. मात्र या वनातून मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होत असल्याचे दिसून येत आहे. वैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तस्करांनी आपला मोर्चा वनाकडे वळविल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : वनांची सुरक्षाही धोक्यात, पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वनसंपदेने नटलेल्या भंडारा जिल्ह्यात मौल्यवान वृक्षांची खुलेआम कत्तल सुरू आहे. या कत्तलीवर वनविभागाचे दुर्लक्ष असून संगणमतानेच हा प्रकार सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रक्षक भक्षक बनल्याचे चित्र असून जंगलांची सुरक्षाही ऐरणीवर आली आहे.पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. वैनगंगासह तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात विपूल वनसंपदा आहे. याशिवाय नागझिरा अभयारण्य, उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्प याशिवाय अनेक राखीव जंगल व जंगलव्याप्त वने आहेत. मात्र या वनातून मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होत असल्याचे दिसून येत आहे. वैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तस्करांनी आपला मोर्चा वनाकडे वळविल्याचे दिसून येते. वृक्षकटाईच्या माध्यमातून लक्षावधींची उलाढाल दिसून येते.वनविभागाच्या रेकॉर्डनुसार नजर फेरल्यास खसऱ्याची अनेक प्रकरणात गौड बंगाल असल्याचे दिसून येईल. मात्र कुणी बोलायला तयार नाही. राखीव जंगलव्याप्त शिवारातून वृक्षांची कत्तली होण्याचे प्रमाण अधिक आहे. दुसरीकडे सरपणासाठी लाकडे गोळा करण्याच्या नावावरही तस्करांनी हैदोस घातला आहे. वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत असली तरी त्या मानाने वृक्ष कटाईची मोहीम अधिक तीव्र असल्याचे जाणवते. राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम अंतर्गत जिल्ह्यालाही मोठे उद्दिष्ट मिळाले होते. त्यात बहुतांशपणे रोपट्यांची लागवडही करण्यात आली. विशेष म्हणजे यापैकी किती रोपट्यांचे संगोपन झाले व किती जगले याचेही संशोधन होणे गरजेचे झाले आहे. वृक्ष संगोपनात किती कोटींचा खर्च झाला याची चौकशी होणेही गरजेचे आहे. किती झाडांचे संगोपन झाले आहे, याचीही माहिती उपलब्ध होईल.खसरा प्रकरणांची चौकशी गरजेचीपरवानगीने वृक्ष कापणी केल्यानंतर सदर खसºयात किती वृक्ष कापण्यात आली याची नोंद केली जाते. त्यात वृक्ष कटाईच्या जवळपास तीन ते पाच पटीने वृक्ष लागवड करावी, असा नियम आहे. मात्र हा नियम सर्रासपणे धाब्यावर बसविण्यात येतो. नियमांना तिलांजली देण्याचा प्रकार हा अनेक वर्षांपासून सुरू आहे. परिणामी आजघडीला वृक्षकटाईमुळे जंगलांची सुरक्षा धोक्यात आली आहे.वृक्ष कापणीनंतर लागवड होत नसल्याने पर्यावरणाचा समतोल साधणार तरी कसा, असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे. खसरा प्रकरणाची चौकशी केल्यास अनेक लहान-मोठे मासे गळाला लागू शकतात. मात्र कंत्राटदार व वनविभाग अधिकाऱ्यांच्या संगणमताने हा सर्व प्रकार होत असल्याने प्रकरण तिथेच दाबले जाते. परिणामी खसरा प्रकरणाची सर्वच वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत चौकशी होणे गरजेचे आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग