लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील मांडवी गावाच्या हद्दीत तिन वर्षांपुर्वी नागपुरच्या माफियांनी रेतीची डम्पिंग केली. या डम्पिंगमधील बहुतांश रेती चोरीला गेली. परंतु याच माफियाने शुक्रवारी रात्री अचानक रेतीची खुलेआम विक्री केली असल्याने प्रशासनावर संताप व्यक्त केले जात आहे. यात मोठे घबाड करण्यात आल्याच्या शंकेला पेव फुटले आहे.वैनगंगा नदी काठावर असणाऱ्या मांडवी आणि तामसवाडी गावाचे नदी पात्रलगत नागपुरच्या मातब्बर माफियाने प्रत्येकी आठ हजार ब्रास रेतीचे डम्पिंग यार्ड तीन वर्षापुर्वी तयार केले. नदी पात्रातून खुलेआम रेतीची चोरी करीत डम्पिंग यार्डमध्ये रेतीची साठवणूक केली. त्यानंतर रेतीघाटाचे लिलाव झाले नसल्याने त्या माफीयाने डम्पिंग यार्डकडे फिरकने बंद केले. मांडवी गावात असणाऱ्या रेतीच्या डम्पिंग यार्डकडे स्थानिक रेती चोरट्यांची नजर गेल्याने त्यांनी एक हजार ब्रास रेतीची चोरी केली आहे. हा डम्पिंग यार्ड अधिकृत नसल्याने त्या माफियाने रेती चोरीची पोलिसात तक्रार केली नाही. गत तीन वर्षांपासून असणाºया डम्पिंग यार्डमधील रेतीत मातीचे प्रमाण अधिक असल्याने रेती चोरट्यांनी नदी पात्रात मोर्चा वळविला होता. नंतर डम्पिंग यार्डमधील रेतीची चोरी त्यांनी थांबविली. शुक्रवारी दिवसभर ट्रॅक्टर आणि जेसीबी मशीनच्या सहायाने डम्पिंगमधील रेतीची उचल करण्यात आली आहे.त्यावेळी त्याने रेतीची विक्री रॉयल्टी असल्याची माहिती गावकऱ्यांना दिली. यामुळे कुणी विरोध केला नाही. माफियाच्या सोबतीला गावातील अन्य रेती चोरटे होती. त्याचे सहकार्य आणि मदतीने या माफियाने डम्पिंगमधील रेती मुख्य मार्गावर शुक्रवारला दिवसभर जमा केली. नविन डम्पिंग यार्ड तयार केले. रात्री या नविन डम्पिंग यार्डमधील रेतीची विक्री करण्यात आली आहे.५० पेक्षा अधिक ट्रकमध्ये रेतीची वाहतूक तिरोडा मार्गाने करण्यात आली आहे. माफियाकडे रेती विक्रीची रॉयल्टी असतांना रात्री रेती विक्रीची काय आवश्यकता होती, असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित करीत मोठा घबाड करण्यात आल्याचा आरोप केला आहे. माफीया व त्यांचे गावातील सहकारी यांनी गावकऱ्यांची दिशाभूल केली आहे.माफीयांचे दबाव आणि वजनात यंत्रणात काम करीत असल्याच्या चर्चांना परिसरात उधाण आले आहे. माफीयाकडे रॉयल्टी शासनाने दिली असल्यास सुर्योदय ते सुर्यास्तपर्यंत डम्पिंगमधील रेतीची विक्री करण्याची ओरड गावात सुरु झाली असून रात्री रेतीची विक्री करण्यात आल्याने झोपमोड होत असल्याची माहिती गावकºयांनी दिली. गावातून रेतीची पुन्हा वाहतूक झाल्यास ट्रक अडविणार असल्याचा इशारा आहे.नियमांची पायमल्लीरेतीची विक्री करतांना पर्यावरणाचे नियम पायदळी तुडविण्यात आले आहे. या परिसरात रेतीची डम्पिंग आणि ट्रकमध्ये उपसा करण्यावर बंदी पोलीस आणि महसूल विभागाने घातली आहे. मात्र मांडवी गावात खुलेआम बंदीला तोडण्यात आले आहे. वैनगंगा नदी पात्रात पुराचे पाणी वाहत आहे. यामुळे नदी पात्रातून रेतीची उपसा सध्या बंद असल्याने डम्पिंग यार्ड माफियाचे आता सुगीचे दिवस आले आहे. ही रेती नागपुरला रवानगी करण्यात येत आहे. मांडवी गावातील रेतीची उचल करतांना विरोध नाही, परंतु रॉयल्टी असतांना चोरीच्या पध्दतीने रेतीची उचल करण्यात आल्याने गावकºयांच्या जिव्हारी लागले आहे.
नागपूरच्या माफियाकरवी मांडवीत रेतीची खुलेआम विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:01 IST
वैनगंगा नदी काठावर असणाऱ्या मांडवी आणि तामसवाडी गावाचे नदी पात्रलगत नागपुरच्या मातब्बर माफियाने प्रत्येकी आठ हजार ब्रास रेतीचे डम्पिंग यार्ड तीन वर्षापुर्वी तयार केले. नदी पात्रातून खुलेआम रेतीची चोरी करीत डम्पिंग यार्डमध्ये रेतीची साठवणूक केली. त्यानंतर रेतीघाटाचे लिलाव झाले नसल्याने त्या माफीयाने डम्पिंग यार्डकडे फिरकने बंद केले.
नागपूरच्या माफियाकरवी मांडवीत रेतीची खुलेआम विक्री
ठळक मुद्देरॉयल्टी असल्याची बतावणी। शुक्रवारच्या रात्री ५० ट्रकमध्ये रेतीची रवानगी