शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

तुमसर येथील मोकळे पटांगण, शेत शिवारात भरते मद्यपींची जत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 5:00 AM

लॉकडाऊनने तुमसर शहरातील सर्व वाईन शॉप व बियर बार २० मेपर्यंत बंद होते. मात्र आता प्रशासनाने वाईन शॉपमधून आॅनलाइन दारू खरेदीला संमती दिली आहे. त्यामुळे मद्य शौकिनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रोज सायंकाळी बिअर बारमध्ये बसून पिण्याची सवय असलेल्या अनेक युवकांना आणि वृद्धांना आता बिअर बार बंद असल्यामुळे अडचण होत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये शक्कल : मैदानात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : लॉकडाऊनने शहरातील बिअरबार व वाईन शॉप बंद आहेत. मात्र जिल्ह्यातील काही तालुक्यात व जिल्हाबाहेर वाईन शॉप सुरू असल्याने तालुक्यातील मद्यशौकीन तेथे जाऊन दारूची व्यवस्था जरी करीत असले तरी दारू पिण्याची व्यवस्था नसल्याने मद्य शौकिनानांनी शहरातील उघड्या मैदानात व जवळच्या शेत शिवारात मद्यपी एकत्रीत येऊन गर्दी करीत आहेत. त्याठिकाणी जणू जत्रेचे स्वरुप आल्याचे दिसून येते.लॉकडाऊनने तुमसर शहरातील सर्व वाईन शॉप व बियर बार २० मेपर्यंत बंद होते. मात्र आता प्रशासनाने वाईन शॉपमधून आॅनलाइन दारू खरेदीला संमती दिली आहे. त्यामुळे मद्य शौकिनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रोज सायंकाळी बिअर बारमध्ये बसून पिण्याची सवय असलेल्या अनेक युवकांना आणि वृद्धांना आता बिअर बार बंद असल्यामुळे अडचण होत आहे. परिणामी मद्य शौकिनांनी नवीन शक्कल लढवून शहरातील मोकळ्या जागेवर किंवा जवळ असलेल्या शेतामध्ये बेकायदेशीर दारू खरेदी करून याठिकाणी निवांतपणे बसून उघड्या आकाशाखाली दारुचा आनंद घेत आहेत. परिसरात दारू बियरच्या रिकाम्या बाटलांचा खच पडलेला दिसून येतो. परिणामी शहरात शांतता व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या शहरात वाईन शॉप व बियरबार बंद असले तरी दारू शौकीन कोणत्याही पद्धतीने दारूची व्यवस्था करून आपला तलफ आजवर पूर्ण करीत आला आहे. मात्र आता तर आॅनलाइन दारू मिळणे सुरु झाले आहे. त्यामुळे हे मद्य शौकिन दारू मिळाल्यानंतर बसण्यासाठी ओसाड जागेचा अधिकाधिक वापर करणार आहेत. बंद पानटपऱ्या, शाळेचा आवार, कृषी उत्पत्र बाजार समितीसमोरील मोकळ्या जागेवर दररोज सायंकाळच्या सुमारास पाच ते सात लोकांचे गट वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले दिसतात. सायंकाळ होताच शौकीन फिरण्याच्या बहाण्याने या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दारू घेऊन बसलेले असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना येथून येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. मद्य शौकीन तिथेच दारूच्या रिकाम्या बाटल्या फेकतात. प्रसंगी रस्त्यावर रिकाम्या काचेच्या बाटल्या फोडत असल्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाºया महिला, आबाल वृद्धांना इजा होत आहे. यावर पोलीस प्रशासनाने वेळीच अंकुश लावण्याची गरज आहे.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदा