अवकाळीच्या नुकसानीची केवळ साडेसात कोटी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 06:00 AM2020-02-19T06:00:00+5:302020-02-19T06:00:45+5:30

भंडारा जिल्ह्यात यावर्षी अवकाळी पावसाने कहर केला. सुरुवातीला पावसाने दगा दिला. मात्र ऐन काढणीच्या वेळी दिवाळीत धो-धो अवकाळी पाऊस बरसला. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात या पावसाने नुकसान झाले. त्यात साकोली, लाखनी, लाखांदूर या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाच्या वतीने ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले.

Only one and a half crore relief of premature loss | अवकाळीच्या नुकसानीची केवळ साडेसात कोटी मदत

अवकाळीच्या नुकसानीची केवळ साडेसात कोटी मदत

Next
ठळक मुद्देआठ हजार हेक्टर नुकसान : ऑक्टोबरमधील पावसाचा तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात खरीप हंगामात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सात कोटी ४२ लाख ४५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित तहसीलकडे तो वळता करण्यात आला आहे. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण खरीप आणि आता रबी हंगामातही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. परंतु आठ हजार ८०६ हेक्टरच्या नुकसानीपोटी अत्यल्प मदत आल्याने शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी दिसत आहे.
भंडारा जिल्ह्यात यावर्षी अवकाळी पावसाने कहर केला. सुरुवातीला पावसाने दगा दिला. मात्र ऐन काढणीच्या वेळी दिवाळीत धो-धो अवकाळी पाऊस बरसला. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात या पावसाने नुकसान झाले. त्यात साकोली, लाखनी, लाखांदूर या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाच्या वतीने ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात आठ हजार ८०६ हेक्टर नुकसान झाल्याचे पुढे आले. त्यावरून जिल्हा प्रशासनाने ७ कोटी ६७ लाख रुपयांची नुकसानभरपाई शासनाकडे मागणी केली. शासनाकडून ऱ्यांक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी निधी मंजूर झाला आहे. मात्र त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीबाबत ना सर्वेक्षण झाले ना मदतीची मागणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही अगदी तुटपंूजी मदत मिळाली.

केंद्रबाहेरील धानाच्या नुकसानीचे काय?
शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी आणलेला धान अवकाळी पावसात ओला झाला. अनेकांच्या धानाला पोत्यातच अंकुर फुटले. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. परंतु केंद्राबाहेर उघड्यावर असलेल्या धानाच्या नुकसानीबाबत कुणीही बोलायला तयार नाही. विशेष म्हणजे गोदाम हाऊसफुल्ल झाल्याने धान खरेदी ठप्प झाली होती. शेतकऱ्यांचा धान उघड्यावरच पडून होता. आता या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Only one and a half crore relief of premature loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.