जिल्ह्यात दाेन्ही डाेस घेणारे केवळ 23 टक्के !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 05:00 IST2021-07-07T05:00:00+5:302021-07-07T05:00:34+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत चार लक्ष ३७ हजार ६७४ नागरिकांनी डोसेज घेतले आहेत. यात प्रथम डोस घेणारे तीन लक्ष १६ हजार ४११ नागरिक असून तर दुसरा डोस एक लक्ष एकवीस हजार २६३ नागरिकांनी घेतला आहे. ग्रामीण भागात आजही लसीकरणाबाबत काही गैरसमज दिसून येत आहे तर काही ठिकाणी गैरसमज आहेत. जागृतीची गरज आहे.

जिल्ह्यात दाेन्ही डाेस घेणारे केवळ 23 टक्के !
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात २१ जूनपासून लसीकरणाला पुन्हा प्रारंभ झाला असला तरी आतापर्यंत दोन्ही डोस देणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या फक्त २३ टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. डेल्टा प्लस या कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटला रोखायचे असेल तर लसीकरण जलद गतीने होणे अपेक्षित आहे. याकडे आता जिल्हा आरोग्य प्रशासनाला लक्ष देत जनजागृतीसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत चार लक्ष ३७ हजार ६७४ नागरिकांनी डोसेज घेतले आहेत. यात प्रथम डोस घेणारे तीन लक्ष १६ हजार ४११ नागरिक असून तर दुसरा डोस एक लक्ष एकवीस हजार २६३ नागरिकांनी घेतला आहे. ग्रामीण भागात आजही लसीकरणाबाबत काही गैरसमज दिसून येत आहे तर काही ठिकाणी गैरसमज आहेत. जागृतीची गरज आहे.
१८ ते ४४ वयोगट
- जिल्ह्यात लसीकरण अंतर्गत १८ ते ४४ या वयोगटातील एकूण तीन लक्ष ३७ हजार ७७२ लाभार्थ्यांना लसीकरण करायचे आहे. यात प्रथम डोस अंतर्गत ८४ हजार ४९० नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.
- या वयोगटातील दुसरा डोस फक्त सहा हजार ६७ नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे या वयोगटातील संख्या मोठी असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीत दुसरा डोस निर्धारित वेळेत पूर्ण होणे अपेक्षित आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
जनजागृतीची नितांत गरज
- जिल्ह्यात लसीकरणाला हवा तेवढा वाव मिळत नसल्याचे दृश्य आहे त्यामुळे सर्वच वयोगटातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लस घ्यावी यादृष्टीने आरोग्य प्रशासनाला पुन्हा एकदा नव्याने जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
- किंबहुना १८ ते ४४ व ४५ ते ५९ या गटातील नागरिकांना विशेष करून ग्रामीण भागात जनजागृतीवर भर देण्याची आवश्यकता आहे.
- सुरूवातीच्या काळात फ्रंट लाइन वर्कर व हेल्थ केअर वर्कर यांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत करण्यात आले आहे.