६३ प्रकल्पांत केवळ २० टक्के जलसाठा
By Admin | Updated: December 6, 2015 00:25 IST2015-12-06T00:25:16+5:302015-12-06T00:25:16+5:30
ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकेत दिसत आहेत. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़

६३ प्रकल्पांत केवळ २० टक्के जलसाठा
पाणीटंचाई भेडसावणार : गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात किंचित वाढ
भंडारा : ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकेत दिसत आहेत. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ २०़६४ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ०.५ टक्क्यानी वाढ झाली आहे.
लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ वर्तमान स्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ९़१३, बघेडा २़६४२, बेटेकर बोथली व सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा निरंक असल्याची नोंद आहे़
भंडारा जिल्ह्यात एकूण लघू प्रकल्प ३१ आहेत. जूने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्या स्थितीत ३१ लघू प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २५़५७ टक्के आहे़ जुने माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा केवळ २९.९४ टक्के आहे़ जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली.
मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावनवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार यांचा समावेश आहे. (नगर प्रतिनिधी)
१२ प्रकल्पात जलसाठा शून्य
यावर्षी पावसाच्या दडीमुळे प्रकल्पात पाहिजे त्या प्रमाणात जलसाठा झाला नाही. जो जलसाठा होता.त्या पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी शेतीसाठी व इतर कामासाठी करण्यात आला. त्यामुळे ऐन हिवाळ्यात प्रकल्पात जलसाठा निरंक आहे. यामध्ये जिल्ह्यातील १२ प्रकल्पाचा समावेश आहे. १२ प्रकल्पामध्ये बेटेकर बोथली, सोरणा, पवनारखारी, हिवरा, आमगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, डोंगरगाव, एकलाझरी, जांभोरा, कोका गावांचा समावेश आहे.
संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजनेची गरज
यावर्षी प्रकल्प, तलाव, बोड्यामध्ये पाण्याचा अल्प साठा असल्याने येत्या उन्हाळ्यात जिल्हावासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने आतापासून उपाययोजना करण्याची गरज आहे.