शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 05:00 IST

लाखांदूर तालुक्यात २१ ऑगष्ट रोजी अतिवृष्टी आणि महिन्याच्या अखेरीस वैनगंगा व चुलबंद नदीला महापूर आला. त्यात शेकडो घरांची पडझड तर हजारो कुटुंब स्थलांतरीत झाले होते.अतिवृष्टीमध्ये १६२ घर व गोठ्यांची अंशत: पडझड झाली होती. त्यापैकी १०७ कुटुंबांना शासन मदत देण्यात आली असुन उर्वरित ५५ कुटूंब अनुदानाअभावी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देअनुदानाचा अभाव : लाखांदूर तालुक्याला वैनगंगा व चुलबंदच्या पुराचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : ऑगष्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापूरात तालुक्यातील शेकडो कुटुंब बाधित झाले होते. मात्र निम्म्या कुटुंबांना शासनाची मदत मिळाली असून सुमारे एक हजार कुटुंब अद्यापही मदतीपासून वंचित आहे. पुरेसे अनुदान आले नसल्याने पूरग्रस्त मदतीपासून वंचित असल्याची महिती पुढे आली आहे.लाखांदूर तालुक्यात २१ ऑगष्ट रोजी अतिवृष्टी आणि महिन्याच्या अखेरीस वैनगंगा व चुलबंद नदीला महापूर आला. त्यात शेकडो घरांची पडझड तर हजारो कुटुंब स्थलांतरीत झाले होते.अतिवृष्टीमध्ये १६२ घर व गोठ्यांची अंशत: पडझड झाली होती. त्यापैकी १०७ कुटुंबांना शासन मदत देण्यात आली असुन उर्वरित ५५ कुटूंब अनुदानाअभावी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. महापूरामुळे तालुक्यातील ७८ घरांची पुर्णत: पडझड झाली होती.त्यापैकी केवळ २३ कुटुंबांना मदत देण्यात आली असुन ५५ कुटूंब शिल्लक आहेत.या महापूरामु १९९ घर व गोठ्यांची पडझड झाली होती. त्यापैकी केवळ पाच कुटुंबांना मदत तर १९४ कुटुंब मदतीपासून वंचित आहेत. एवढेच नव्हे तर या पूरमुळे १५२७ कुटुंब स्थलांतरीत झाले होते. त्यापैकी ८१६ कुटुंबांना मदत झाली होती तर उर्वरित ७११ कुटूंब अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. दरम्यान अतिवृष्टी व पुरपरिस्थीत शासनाकडून उपलब्ध शासन अनुदानानुसार येथील तालुका प्रशासना अंतर्गत ७० लाखांचे अनुदान देण्यात आले आहे. तर अतिवृष्टी व पुरपरिस्थीतीतील बाधित जवळपास एक हजार १५ कुटुंब अनुदानाअभावी अद्यापही शासन मदतीपासून वंचित असल्याची माहिती आहे. पुरपरिस्थीतीत खैरना येथे पुरात बुडून मृत तरुणाच्या कुटुंबाला देखील सुमारे चार लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मात्र या पुरात १४ पशू व दोन कुक्कुट पालन केंद्र वाहुन जातांना सबंधितांना देखील शासन मदत अनुदानाअभावी देण्यात आली नाही.याप्रकरणी शासनाने अतिवृष्टी व पुरपरिस्थीतीत बाधित कुटुंबांना शासन मदत देण्यासाठी अनुदान उपलब्ध करण्यात यावे अशी मागणी आहे.

टॅग्स :floodपूर