एका सचिवाकडे १२ गावांचा कारभार

By Admin | Updated: April 14, 2016 00:49 IST2016-04-14T00:49:05+5:302016-04-14T00:49:05+5:30

सिहोरा परिसरात असणाऱ्या ४३ गावातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात कर्ज वितरणासाठी ४ गट सचिव आहेत.

One secretary has control of 12 villages | एका सचिवाकडे १२ गावांचा कारभार

एका सचिवाकडे १२ गावांचा कारभार

कर्ज वितरण प्रभावित : क्रॉप लोनकरिता शेतकऱ्यांची गर्दी
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात असणाऱ्या ४३ गावातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात कर्ज वितरणासाठी ४ गट सचिव आहेत. यामुळे कर्ज वितरण प्रणाली प्रभावित ठरत आहे.
शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केली जात आहेत. बिन व्याजी कर्जाचा पुरवठा करणाऱ्याचा उदो उदो केला जात असला तरी जलद गतीने शेतकऱ्यांना आर्थिक कर्जाचा पुरवठा करणारी दर्जेदार यंत्रणाच नाही. यामुळे भर उन्हात शेतकऱ्यांची पायपीट सुरू झाली आहे. सिहोरा परिसरात ग्रामीण भागात वास्तव्य करणारे शेतकरी यांना गावातच शेती विषयक कर्ज पुरवठा करण्यासाठी सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत.
या संस्थेत एक ना धड भाराभर चिंन्धा अशी अवस्था असल्याचे चित्र आहे. या संस्थाचे स्वत:चे पक्के कार्यालय नाही.
४ खुर्च्या आणी १ टेबल असे कार्यालयाचे स्वरूप आहे. आमदनी अठन्नी, खर्च रूपया असे गणित या संस्थाचे आहे. उत्पन्नाचे वाढते प्रमाण नसल्याने बेदखल करण्याची परंपरा शासन स्तरावर आहे. यामुळे या संस्थाना यांचा फटका बसला आहे. ४३ गावातील शेतकऱ्यांना क्राप लोन वाटप करण्यासाठी ४ गट सचिव नियुक्त आहे.
एका गट सचिवाकडे १२ गावांचा प्रशासकीय कारभार असून एका पेक्षा अधिक सेवासहकारी संस्थाचा जबाबदारी देण्यात आली आहे. मार्च अखेर पूर्ण होताच शेतकरी या संस्थाकडे धाव घेत आहे. क्राप लोनकरिता शेतकऱ्यांची धावा धाव सुरू झाली आहे.
परिसरात असणारे तलाठी कार्यालये शेतकऱ्यांचे गर्दीने फुल्ल झाली आहेत. शेतीविषयक दस्तऐवज प्राप्त करण्यासाठी सकाळपासून शेतकऱ्यात लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान गट सचिवाचे रिक्त पदे तथा अतिरिक्त गावाच्या जबाबदारीने कंबरडे मोडणारे ठरत आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी कुणी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
यंदा भीषण दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे कारणावरून गेल्या वर्षातील क्रॉप लोन देयक शेतकऱ्यांनी प्रभावित केली असल्याची माहिती मिळाली आहे. (वार्ताहर)

Web Title: One secretary has control of 12 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.