शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

वाहनांच्या रांगातून त्रिमूर्ती चौकात शोधावा लागतो मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2023 17:49 IST

त्रिमूर्ती चौकात मुख्य शासकीय कार्यालये आहेत. येथे सभा, मोर्चा, धरणे आंदोलने होत असतात.

- देवानंद नंदेश्वरभंडारा : शहराची लाेकसंख्या दीड लाखाच्या घरात आहे. लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या तसेच अन्य गावांतून व शहरांतून रोजगार व कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच महामार्गावर असलेल्या शहरातील अत्यंत वर्दळीचा त्रिमूर्ती चौक अजून किती बळी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अरुंद चौकात वाहनांचा भरधाव वेग व वाहतूक कर्मचाऱ्याची थोडीशीही चूक जिवावर बेतू शकते. अपघात ही बाब नित्याचीच झाली आहे.

त्रिमूर्ती चौकात मुख्य शासकीय कार्यालये आहेत. येथे सभा, मोर्चा, धरणे आंदोलने होत असतात. येथूनच बसस्थानक व कॉलेज मार्ग आहे. अपघात थांबविण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियंत्रणासाठी कोणतीही ठोस व्यवस्था उभारलेली दिसत नाही. सिग्नल असूनही ते फक्त शोभेचे ठरले आहे. या धोक्याच्या चौकातून जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.

शहरातील अत्यंत धोकादायक व वर्दळीच्या चौकात महामार्गावरील जड वाहतुकीमुळे नेहमी अपघात घडत असतात. रस्त्यांच्या कडेला फूटपाथ व्यावसायिकांचे अतिक्रमण आहे. बस व ऑटोचा थांबा आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यातून नेहमीच वाहतूक पोलिसांची दमछाक होते. दोन वाहतूक पोलिस सदैव तैनात असतात. तीन दिवसांपूर्वीच महामार्गाच्या कडेवरील अतिक्रमण काढण्यात आले. परंतु त्यामुळे रस्ता मोठा होणार नाही. रस्त्याच्या कडेला पाच ते सहा दशकांपासूनचे विशालकाय वृक्ष आहेत. नागपूर, पवनी, लाखनी येथून येणारे नागरिक शहरात प्रवेश करताना त्रिमूर्ती चौकातील रस्त्यांचा अधिक वापर करतात.

महामार्गावरील वाहतूक कोंडी नित्याचीचत्रिमूर्ती चौकातून ये-जा करताना महामार्ग ओलांडावाच लागतो. मात्र महामार्गाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतूक काेंडी नित्याची आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची नेहमीच दमछाक होताना दिसून येते. शहराचा प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावरून लोकप्रतिनिधी, अधिकारी यांचे नेहमी आवागमन असते. मात्र समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडून पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना केली जात नाही.ही आहेत अपघातांची कारणे- सायंकाळी शाळा व शासकीय कार्यालय तसेच असंघटित क्षेत्रातील मजूर, कामगारांची सुट्टी झालेली असते.- प्रत्येकजण घाईत असतो. वाहन पुढे दामटण्याच्या नादात हमखास अपघात होतो. वेगावर नियंत्रण नसते.- रात्रीचा अंधार, रस्त्यावरील खड्डे, मद्यपान करून वाहन चालविण्याची सवय.- बेशिस्त वाहतूक, नियमांचे पालन न करणे, हेल्मेट व सीटबेल्ट न बांधणे.- ओव्हरटेक तसेच जड वाहतूकही अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी