जागेच्या वादातून वृद्धाचा खून

By Admin | Updated: July 21, 2015 00:34 IST2015-07-21T00:34:54+5:302015-07-21T00:34:54+5:30

जागेच्या वादातून एका ७० वर्षीय वृद्धाला लाकडी बल्लीने मारहाण करण्यात आली.

Old age blood clash | जागेच्या वादातून वृद्धाचा खून

जागेच्या वादातून वृद्धाचा खून

अकोला (टोला) येथील घटना : परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल, लाकडी खांबाने मारहाण
आंधळगाव : जागेच्या वादातून एका ७० वर्षीय वृद्धाला लाकडी बल्लीने मारहाण करण्यात आली. या घटनेत वृद्धाचा उपचारादरम्यान एका खासगी रुग्णालयात आज (सोमवारी) मृत्यू झाला. हरिराम मारोती बाहे असे मृताचे नाव आहे. ही घटना काल रविवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास मोहाडी तालुक्यातील अकोला टोला येथे घडली. या प्रकरणात दोन्ही गटातील इसमांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रानुसार, हरिराम मारोती बाहे व त्यांच्या बाजूला असलेल्या विजय बाहे यांचे घर आहे. हरिराम आणि विजय बाहे या दोन्ही कुटुंबांमध्ये जागेचा वाद आहे. शौचालयाकडे जाणाऱ्या मार्गावर जलाऊ काड्या का ठेवल्या या कारणाहून दोन्ही कुटुंबात वाद सुरु झाला. वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. यात हरिराम बाहे यांना घराच्या आड्यातील लाकडी बल्लीने मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
दरम्यान, गंभीररित्या जखमी झालेल्या हरिराम बाहे यांना भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज सोमवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मच्छिंद्र बाहे यांच्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी श्रावण सदाशिव बाहे, बंडू दौलत बाहे, विजय संपत बाहे व जीवन बाहे यांच्याविरुद्ध भादंविच्या ३०२, ३२४, ३२३, ५०४, ५०६ (३४) कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
या सर्वांना दि. २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसेच विजय बाहे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी धरमदास बाहे, देवदास बाहे व कृष्णा बाहे व अन्य एका विरुद्ध भादंविच्या ३२४, ३२३, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अकोला टोला येथे या घटनेची चर्चा होती. पुढील तपास आंधळगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळबांधे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Old age blood clash