शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

पंचनामे न करताच परत गेले अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 6:00 AM

तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यांना सांगून पंचनामे करण्यासाठी शेतात आले नसल्याचे प्रकार चौरास भागात घडल्याचे शेतकरी सांगत आहे. दुसरीकडे शेतकºयांना, पंचनामे केले नाही तरी सरसकट नुकसान भरपाई मिळणार, असे कर्मचारी सांगत आहे. राज्य शासनाने पिकांचा नुकसानीचा फोटो जरी दाखवला तरी आर्थिक नुकसान भरपाई मिळेल, असे सांगितले होते. पण याच्या उलट प्र्रकार चौरास भागात होत आहेत.

ठळक मुद्देव्यथा चौरास भागातील : शेतकऱ्यांचा आरोप, तर मदत कशी मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : परतीच्या पावसाने पावणेपाच एकरातील धान पीक मातीमोल झाले. या धानपिकांचा पंचनामा करण्यासाठी तलाठ्याकडे विणवनी करण्यात आली. पण सध्या पंचनामे करणे बंद झाले आहे, असे म्हणून शेतकºयाुा परतवून लावले. दोन लाख २५ हजाराचे धान गेल्याने कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न लिलाबाई येवले (७३) यांना पडला आहे.विशेष म्हणजे पंचनामे न करताच अधिकारी व कर्मचारी परत गेले, असा आरोप चौरास भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यांना सांगून पंचनामे करण्यासाठी शेतात आले नसल्याचे प्रकार चौरास भागात घडल्याचे शेतकरी सांगत आहे. दुसरीकडे शेतकºयांना, पंचनामे केले नाही तरी सरसकट नुकसान भरपाई मिळणार, असे कर्मचारी सांगत आहे. राज्य शासनाने पिकांचा नुकसानीचा फोटो जरी दाखवला तरी आर्थिक नुकसान भरपाई मिळेल, असे सांगितले होते. पण याच्या उलट प्र्रकार चौरास भागात होत आहेत. अनेक शेतकºयांचे धानाचे पीक परतीच्या पावसाने पुर्णत: गेले. पण कर्मचारी बांधावर जाऊन पंचनामे करीत नाही, असे दिसत आहे.सेंद्री बु. येथील शेतजमीन पालोरा चौ. तलाठी साझ्यात येते. येथील तलाठी वासनिक यांना लिलाबाई येवले (७३) यांच्यातर्फे मुलगा सुनील येवले यांनी पीक नुकसानीचा फोटो दाखविला. सर्व पीक परतीच्या पावसाने जमिनदोस्त झाले. कापणीला आलेले पीक लोटल्याने कीडीने पुर्णपणे फस्त केले. शंभर टक्के अनुदान झाले. त्यामुळे हवालदिल झाल्याचे त्यांनी सांगितले. सेवासहकारी संस्थेचे पीक कर्ज ६७ हजार रासायनिक खताची उधारी २५ हजार व शेतीसाठी घेतलेले पतसंस्थेचे ५० हजार इतर कर्ज एक लाख ५० हजार रूपये कसे भरावे असा प्रश्न पडला आहे.कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त शेतीवर आहे. सेवा सहकारी संस्थेतून कर्ज घेताना पीक विमा कपात केली म्हणून पीक विमा कंपनीच्या कर्मचाºयास फोन केला त तो देखिल शेतावर येण्यास तयार नाही. ‘सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई मिळेल’, असे गोड बोलून आम्हची बोळवण करीत आहे. शेतातील नुकसान भरपाईचा पंचनामा केला नाही तर पीक विमा मिळेल, शासन आर्थिक मदत कशाच्या आधारे देईल, अशी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांची झालेली आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी चौरास भागातील शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती