अधिकारी-तलाठ्यांची सभा झाडाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 22:05 IST2018-04-25T22:05:55+5:302018-04-25T22:05:55+5:30

येथील तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी व तलाठी यांची आढावा सभा तहसील कार्यालयाच्या मागील झाडाखाली घेण्यात आल्याने चर्चेला उधाण आले होते.

Officers-Talathi meeting under the tree | अधिकारी-तलाठ्यांची सभा झाडाखाली

अधिकारी-तलाठ्यांची सभा झाडाखाली

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : येथील तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी व तलाठी यांची आढावा सभा तहसील कार्यालयाच्या मागील झाडाखाली घेण्यात आल्याने चर्चेला उधाण आले होते.
२५ एप्रिल रोजी तहसील कार्यालय मोहाडी परिसरातील विद्युत पुरवठा सकाळपासून खंडीत झाला असल्याने तहसील कार्यालयात उकाडा वाढला. तहसीलदारांनी शक्कल लढविली. झाडाखाली आढावा बैठकीला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे तहसील कार्यालयाला जनित्र देण्यात आला आहे. मात्र हा जनित्र नादुरुस्त असल्याने कार्यालयातील पंखे, कुलर सुरु करता आले नाही. काही दिवसापूर्वीच जनित्र दुरुस्त करण्यात आले होते. वीज पुरवठा खंडीत असल्याने व उन्हाळ्याचे दिवस असल्याने कार्यालयात उकाडा वाढल्याने संपूर्ण कर्मचारी बाहेर गेले होते. अघोषित सुटी सारखे चित्र कार्यालयात दिसत होते. झाडाखाली आयोजित केलेली आढावा सभा मात्र येथे येणाऱ्या नागरिकांसाठी कुतुहलाचा विषय ठरली.

Web Title: Officers-Talathi meeting under the tree