शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

संवैधानिक अधिकारासाठी ओबीसी जनगणना आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

बैठकीला ओबीसी जनगणना परिषदेचे समन्वयक सदानंद इलमे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, ओबीसी जनगणना परिषदेचे डॉ. बाळकृष्ण सार्वे, प्रा.भगीरथ धोटे, प्रा.राजेंद्र पटले व आदी उपस्थित होते. डॉ. बोपचे म्हणाले, ओबीसींचे आंदोलन हे येणाऱ्या पिढीसाठी असून या पिढीने ओबीसींच्या हक्क-आंदोलनाच्या लढ्यात सहभागी होणे काळाची गरज झाली आहे.

ठळक मुद्देखुशाल बोपचे : तुमसर येथे ओबीसी जनगणना परिषदेची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देशातील बहुसंख्येने असलेला मुळ निवासी समाज ओबीसी आहे. या समाजाची जनगणना साधन सामुग्रीच्या अभाव असताना इंग्रज काळात केली जावू शकते, तर आजच्या काळात सर्व साधने उपलब्ध असताना ओबीसींची जनगणना करण्यासाठी देश स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंतच्या एकाही सरकारने न घेतलेला पुढाकार हा ओबीसीच्या हक्क अधिकारापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. ओबीसींना संवैधानिक अधिकार प्राप्त करुन घेण्यासाठी जनगणना आवश्यक आहे. जनगणना व्हावी, यासाठी शासनावर दबाव तंत्राचा वापर करण्याच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी संघाचे कार्याध्यक्ष व राजकीय समन्वयक डॉ. खुशाल बोपचे यांनी केले.तुमसर येथील श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा येथे ओबीसी जनगणना परिषद भंडाराच्यावतीने आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.बैठकीला ओबीसी जनगणना परिषदेचे समन्वयक सदानंद इलमे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, ओबीसी जनगणना परिषदेचे डॉ. बाळकृष्ण सार्वे, प्रा.भगीरथ धोटे, प्रा.राजेंद्र पटले व आदी उपस्थित होते.डॉ. बोपचे म्हणाले, ओबीसींचे आंदोलन हे येणाऱ्या पिढीसाठी असून या पिढीने ओबीसींच्या हक्क-आंदोलनाच्या लढ्यात सहभागी होणे काळाची गरज झाली आहे. ओबीसी आंदोलन हे सामाजिक चळवळ असून ओबीसींवर लादलेली असंवैधानिक क्रिमिलीअर अट सरकारने रद्द करायला हवी. सोबतच येत्या मार्च महिन्यापासून सुरु होणाºया जनगणनेमध्ये ओबीसींचा स्वतंत्र रखाना तयार करुन आमची संख्या मोजण्यात यावी, यासाठी आयोजित ४ जानेवारीच्या जिल्हास्तरीय मोर्च्यात ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.यावेळी सदानंद इलमे, खेमेंद्र कटरे यांनी मार्गदर्शन केले. संचालन विश्वजीत फुंडे यांनी केले. बैठकीला गोपाल ठवकर, मोरेश्वर तिजारे, गजानन बुराडे, राजेंद्र कडव, श्रीधर उरकुडे, भजनदास बोळणे, अशोक ठाकरे, हैसोक शरणागत, रामलाल बोंदरे, मिलींद कापगते, लालचंद कटरे, चंद्रकुमार रहांगडाले, योगराज आंजनकर, सरीफ शेख, सुधाकर कहालकर, मनोज डोये, महेश गडेरिया, दामोदर डहाळे, कुवरलाल पटले, अभिमन्यू पटले, खेमराज नागफासे, चंद्रशेखर भोयर, जे. के. मने, पी.के.संग्रामे आदी ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षण