पौष्टिक ज्वारी खणखणली अन् दडपले गव्हाचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST2021-07-12T04:22:56+5:302021-07-12T04:22:56+5:30

इंद्रपाल कटकवार भंडारा : आहारात पौष्टिकता असणे गरजेचे असल्याने पूर्वी जेवणात विविध कडधान्याचा वापर होत असे. मात्र, काळानुरूप यात ...

Nutritious sorghum crushed and crushed wheat prices | पौष्टिक ज्वारी खणखणली अन् दडपले गव्हाचे भाव

पौष्टिक ज्वारी खणखणली अन् दडपले गव्हाचे भाव

इंद्रपाल कटकवार

भंडारा : आहारात पौष्टिकता असणे गरजेचे असल्याने पूर्वी जेवणात विविध कडधान्याचा वापर होत असे. मात्र, काळानुरूप यात बदल होत गेला असून पौष्टिकयुक्त ज्वारीही ताटातून हद्दपार झाली आहे. पौष्टिकयुक्त ज्वारीचे भाव आता वाढले असून त्याची जागा गव्हाने घेतली आहे.

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेडचे प्रमाण जास्त असल्याने शरीराला पटकन अशी ऊर्जा मिळते. ती ऊर्जा मनुष्याला दिवसभर कामी येते. म्हणून पूर्वी व आजही ग्रामीण भागात ज्वारीला प्राधान्य देतात. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव ज्वारीमधून होत असते. त्यामुळेच आता ज्वारीचे भाव वाढले असून गव्हाचा वापर अधिक प्रमाणात होऊ लागला आहे. ज्वारीच्या सेवनाचे खूप सारे फायदे आहेत.

आपल्या आरोग्याची श्रीमंतीही ज्वारीतच

ज्वारी ही अत्यंत पौष्टिक असून रक्तदाब आणि हृदयरोग संबंधित आजारावर मात करण्यासाठी ज्वारीचे सेवन करणे गरजेचे आहे. ज्वारीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मिनरल्समुळे रक्तदाब नियंत्रणात राहते.

वाढत्या प्रदूषणामुळे आणि दगदगीच्या आयुष्यामुळे महिलांमध्ये भरपूर समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी ज्वारीचे सेवन खूप महत्त्वाचे आहे. ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असल्यामुळे त्याने पोट साफ होते. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी चपातीऐवजी आहारात ज्वारीची भाकरी खाणे सर्वोत्तम आहे.

ज्वारीच्या भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा त्रास असणाऱ्यांनी ज्वारीची भाकरी अवश्य खावी.

जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घटले

जिल्ह्यात धान, गहू, सोयाबीन, तूर, जवस आदी पिकांचे उत्पादन होत असते. जवळपास अडीच दशकांपूर्वी ज्वारीचे पीकही जिल्ह्यात घेतले जायचे. मात्र सद्य:स्थितीत जिल्ह्यात ज्वारीचे कुठेही उत्पादन घेतले जात नाही. अन्य राज्यातून किंवा जिल्ह्यातूनच आयात केली जाते.

भाकरीच परवडायची म्हणून खायचो...

ज्वारी ही अत्यंत पौष्टिक असे धान्य असून याचे सेवन प्रत्येकाने करायलाच हवे. आजची पिढी यापासून वंचित आहे.

-राजेश्वरीदेवी वर्मा, तुमसर

ज्वारी ही महिलांसाठी अत्यंत गुणकारी आहे. आधी आम्ही ज्वारीच्या भाकरीवरच दिवस काढत असू.

-वच्छला साखरे, खुटसावरी

Web Title: Nutritious sorghum crushed and crushed wheat prices