पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:11 IST2019-03-02T22:11:11+5:302019-03-02T22:11:25+5:30

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या भरीव मानधनवाढ व इतर मागण्यांसाठी शिवकुमार गणवीर, हिवराज उके व माधवराव बांते यांच्या नेतृत्वात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. मागण्याचे निवेदन अधिकाऱ्यांना सोपविल्यानंतर मोर्च्याची रितसर सांगता करण्यात आली.

Nutritionist Employees' Front | पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मोर्चा

पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मोर्चा

ठळक मुद्देसीईओंना निवेदन : आश्वासनाप्रमाणे पाच हजार मानधन देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या भरीव मानधनवाढ व इतर मागण्यांसाठी शिवकुमार गणवीर, हिवराज उके व माधवराव बांते यांच्या नेतृत्वात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. मागण्याचे निवेदन अधिकाऱ्यांना सोपविल्यानंतर मोर्च्याची रितसर सांगता करण्यात आली.
शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन (आयटक) जिल्हा शाखेच्या वतीने शनिवारला शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन मोर्चा काढण्यात आला. मागण्यांमध्ये स्वयंपाकी कर्मचाºयांना किमान अठरा हजार रुपये किमान वेतन लागू करावे, पण ते शक्य नसल्यास राज्य व केंद्र शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे किमान दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे तेही वर्षाच्या १२ महिन्याकरिता असावे. स्वयंपाकी करिता त्यांच्या कामाच्या अटी व शर्ती तयार करून त्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या जबड्यातून बाहेर काढण्यात यावे, स्वयंपाकी कामगारांना विमा, भविष्य निर्वाह निधी, पेंशन आदी सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्री, मुख्यमंत्री व मानव संसाधन विकास मंत्री जावळेकर यांना पाठविण्यात आले. निवेदन स्वीकारण्यासाठी उपशिक्षणाधिकारी विजयकांत दुबे मोर्चासमोर आले. त्यांनी निवेदनासोबत कर्मचाºयांच्या स्थानिक तक्रारींची नोंद घेतली व शिक्षणाधिकाऱ्यांसोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी झालेल्या सभेत संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर, आयटकचे जिल्हा सचिव हिवराज उके, किसान नेते वामनराव चांदेवार यांचे मार्गदर्शन झाले. मोर्चात राजू बडोले, भाग्यश्री उरकुंडे, सुनिता मडावी, प्रतिमा कान्हेकर, पवित्रा लांडगे, रिना राऊत, विद्या बोंदरे, महानंदा नखाते, वंदना पेशने आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Nutritionist Employees' Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.