शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

आता एकाचवेळी होणार अद्ययावत सेवापुस्तिका

By admin | Updated: November 23, 2014 23:13 IST

शिक्षकांच्या वेळेची बचत व्हावी, याशिवाय कामात पारदर्शकता यावी, यासाठी मोहाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षकांच्या सेवापुस्तिका शिबिर घेऊन अद्ययावत करण्यात येणार

शिक्षण विभागाचा उपक्रम : गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांची माहितींमोहाडी : शिक्षकांच्या वेळेची बचत व्हावी, याशिवाय कामात पारदर्शकता यावी, यासाठी मोहाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षकांच्या सेवापुस्तिका शिबिर घेऊन अद्ययावत करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली आहे. शिक्षकांच्या सेवा पुस्तिका अद्ययावत करून घेण्याचा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच मोहाडी पंचायत समितीच्या शिक्षक विभागाकडून होत आहे. मोहाडी पंचायत समितीमधील शिक्षण विभागाअंतर्गत आठ केंद्र आहेत. या आठही केंद्रात मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, सहायक शिक्षक व केंद्रप्रमुख असे ४२२ जणांचा समावेश आहे. केंद्रस्तरावर शिक्षकांचे मुळ सेवापुस्तिका अद्ययावत करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी राठोड यांनी १८ नोव्हेंबरला आदेश काढले आहेत. कांद्री केंद्रातील शिक्षकांसाठी २६ नोव्हेंबर, आंधळगाव २ डिसेंबर, जांब-पिंडकेपार, नेरी-९ डिसेंबर, पालोरा १२ डिसेंबर, करडी १६, मोहगावदेवी १९, हरदोली २३ डिसेंबर रोजी शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. या शिबिराला मुख्याध्यापक व शिक्षकांनी गैरहजर न राहण्याचे कळविण्यात आले आहे. या शिबिरासाठी अधीक्षक एच.एच. चौधरी, के.एस. खंडाते, ए.एम. कहालकर, एल.बी. तिरपुडे, हिना कुरेशी यांची कार्यालयीन चमू तयार करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या नाविण्यपूर्ण उपक्रमाला शिक्षक मनापासून प्रतिसाद देतील, अशी आशा गटशिक्षणाधिकारी राठोड यांनी व्यक्त केली. या शिबिरामुळे पंचायत समितीला वारंवार भेट देण्याचा मनस्ताप थांबणार आहे. याशिवाय या कामासाठी देवाणघेवाणीचा प्रकारही थांबणार आहे.एकाचवेळी सगळ्या शिक्षकांची कामे होणार असल्यामुळे शिक्षक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या वेळेची बचत होणार आहे. या कामासाठी दिलेल्या शिबिराच्या तारखांना सकाळपाळीत शाळा राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)