आता रेती तस्करांची खैर नाही
By Admin | Updated: May 23, 2014 23:41 IST2014-05-23T23:41:45+5:302014-05-23T23:41:45+5:30
रेतीचे अवैध खणन व अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी समन्वय साधून पथकाद्वारे संभाव्य ठिकाणी धाडी टाकून गुन्हे दाखल करावे,

आता रेती तस्करांची खैर नाही
अवैध वाहतुकीवरही लगाम : जिल्हाधिकार्यांनी दिले गुन्हे नोंदविण्याचे आदेश
भंडारा : रेतीचे अवैध खणन व अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी समन्वय साधून पथकाद्वारे संभाव्य ठिकाणी धाडी टाकून गुन्हे दाखल करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी माधवी खोडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हातरीय समितीची सभेत त्या बोलत होत्या. या आदेशामुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने पीआयएल क्रमांक २९/२०१४, ९ मे २०१४ रोजी रेती उत्खणन व वाहतुकीवर दिलेल्या स्थगिती आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची सभा घेण्यात आली. उच्च न्यायालयाने उक्त पीआयएलमध्ये दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व सुरू असलेल्या रेतीघाटाला तात्काळ बंद करून त्यांना देण्यात आलेल्या वाहतूक पासेस तात्काळ जमा करण्याचे निर्देश जिल्हा खनिकर्म अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. उक्त आदेश हा संपूर्ण राज्यभर लागू असल्याने इतर राज्य व जिल्ह्यातून भंडारा जिल्ह्यात रेतीची वाहतूक करताना प्रवेश करणार्यांवरसुद्धा कायद्यानुसार कारवाईचे स्पष्ट निर्देश पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना देण्यात आले. सर्व रेती घाटाची व्हीडीओग्राफ करण्याबाबत तहसीलदार व पोलीस अधिकारी यांना निर्देश देण्यात आले. याशिवाय यापूर्वी कार्यान्वित असलेल्या मौजा शहापूर, टोल प्लॉझा, लाल बहादूर शास्त्री चौक, वाही, सातोना, जांबकांद्री, मुंडीपार फाटा व लाखांदूर येथील टी पार्इंट येथील चेकपोस्ट तात्काळ सुरू करून त्यावर पोलीस कर्मचारी व महसूल कर्मचारी यांच्या चमूची २४ तासांकरीता नेमणूक करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डा. माधवी खोडे यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)