आता विधानसभेच्या कामाला लागा

By Admin | Updated: June 16, 2014 23:21 IST2014-06-16T23:21:42+5:302014-06-16T23:21:42+5:30

कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा, असे प्रतिपादन खा. प्रफुल पटेल यांंनी केले. राज्यसभेवर अविरोध निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच खा.प्रफुल पटेल भंडारा येथे आले.

Now get the job of the assembly | आता विधानसभेच्या कामाला लागा

आता विधानसभेच्या कामाला लागा

काँग्रेस-राकॉची संयुक्त बैठक : प्रफुल पटेल यांचे आवाहन
भंडारा : कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा, असे प्रतिपादन खा. प्रफुल पटेल यांंनी केले. राज्यसभेवर अविरोध निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच खा.प्रफुल पटेल भंडारा येथे आले. स्थानिक गुजराती समाजवाडी सभागृह, जलाराम चौक, येथील आयोजित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षातर्फे आयोजित बैठकीसाठी उपस्थित होते.
खा. पटेल म्हणाले, विधानसभा निवडणुका मध्ये लोकसभा निवडणुकाप्रमाणे सत्ता परिवर्तनाची शक्यता नसल्याचे सांगितले. याप्रसंगी त्यांनी महाराष्ट्र विधानपरिषद नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघाचे काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार डॉ.बबनराव तायवाडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. पराभवासाठी कोणत्याही कार्यकर्त्याला दोष देणार नाही. आपल्या कार्यप्रणालीतही काही दोष होता असे वाटत नाही. इतकी वर्ष राजकारण करीत असताना या जिल्ह्यातील लोक मला आणि माझ्या कार्यपद्धतीला ओळखत नाही असे होऊ शकत नाही.
देशभरात माझ्या सारखे मतदार संघासाठी तळमळीने काम करणारे मोजके खासदार होते. मी कधीही जात, पात, धर्माचे राजकारण केले नाही. लोकांनी जर विकासाऐवजी अन्य गोष्टी ना महत्व दिले असेल तर माझा काय दोष. भंडारा गोंदिया या मतदार संघासाठी सिंचनापासून तर उद्योग रोजगार वाढीसह प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. या जिल्ह्यांना राज्यात आणि देशात वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न सुरु होता. परंतु विकासाच्या या वाटेवर लोकांनी आपली साथ अर्ध्यातच सोडली. मला या निवडणुकीत हारण्याचे दु:ख नाही. मात्र एका लोकप्रतिनिधीने नेमके कसे काम करावे म्हणजे लोकांची अपेक्षापूर्ती होईल असा प्रश्न पडला आहे. अशी भावना माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली.
यावेळी मंचावर आ.अनिल बावनकर, आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार, महाडाचे सभापती नाना पंचबुद्धे, उद्योगपती मुकेश पटेल, माजी आमदार आनंदराव वंजारी, अर्बन बॅकेचे अध्यक्ष अ‍ॅड.जयंत वैरागडे, मधुकर सांबारे, नरेश डहारे, सागर गणवीर, वर्षा धुर्वे, सीमा भुरे, नलीनी कोरडे व बबनराव तायवाडे उपस्थित होते. संचालन धनंजय दलाल व प्रास्ताविक अविनाश ब्राह्मणकर व आभार प्रदर्शन जिया पटेल यांनी केले. याप्रसंगी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Now get the job of the assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.