शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी खर्चून एकही खेळाडू घडला नाही

By admin | Updated: April 23, 2017 00:46 IST

खेळाडूंना सरावासाठी स्वतंत्र क्रीडांगण उपलब्ध असावे या हेतूने राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालयाने

अशोक पारधी   पवनी खेळाडूंना सरावासाठी स्वतंत्र क्रीडांगण उपलब्ध असावे या हेतूने राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालयाने तालुका स्तरावर क्रीडा संकुलाची निर्मिती केली. निधीचा पुरवठा करुन भव्य इमारत व क्रीडांगण निर्माण केले. परंतु क्रीडा विभागाच्या तकलादू धोरणामुळे कोट्यवधी खर्चून तालुकास्तरावरुन एकही खेळाडू घडू शकला नाही. नियोजनाचा अभाव असल्याने बहुउद्देशिय सभागृहाचे काम गेल्या दोन वर्षापासून अपूर्ण आहे. क्रीडांगणावर माती भरणाशिवाय इतर काहीही होवू शकले नाही. तालुका क्रीडा संकुलासाठी सन २००४ ने मार्च २०१७ या साधारणत: बारा-तेरा वर्षाचे कालावधीत १ कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम खर्च करण्यात आलेली आहे. सुरुवातीला क्रीडा संकुलाची एक इमारत, क्रीडागंणाचे सपाटीकरण व आवारभिंत यासाठी ३० लाखापेक्षा अधिक रक्कम खर्च झाली. त्या इमारतीची देखभाल करणारी यंत्रणा नसल्यामुळे इमारतीचे दार व खिडक्यांची तावदाने यांची तोडफोड झाली. इमारत नादुरुस्त झाली परंतु खेळाडूंना त्याचा उपयोग होवू शकला नाही. त्या इमारतीला तसेच ठेवून त्या इमारतीच्या मागच्या बाजूला मोकळया जागेत भव्य असे बहुउद्देशिय सभागृह उभारण्यात आले. काम अर्धवट आहे परंतु त्यावर ३५ ते ४० लाख रु. खर्च झाल्याची माहिती आहे सदर इमारतीमध्ये इन-डोअर खेळ खेळता येईल अशी सुविधा निर्माण करावयाची होती ती अद्यापही करण्यात आलेली नाही. इमारतीच्या दर्शनी भागातील पोर्चचे काम सुध्दा अर्धवट आहे. सहा महिन्यात पूर्ण करावयाची इमारत तीन वर्षात पूर्ण होवू शकलेली नाही. इमारतीचे काम अपूर्ण आहे विद्युत सुविधा करण्यात आलेली नाही त्यामुळे त्या इमारतीचा उपयोग खेळांडूना होवू शकत नाही. इमारती शिवाय उर्वरीत जागेत ४० लक्ष रुपये खर्च करुन नहराचे खोदकाममधून बाहेर काढण्यात आलेली भिस प्रकारची माती टाकण्यात आलेली आहे खरे तर क्रीडांगणावर भिस ऐवजी भसवा प्रकारची मऊ असलेली माती टाकावयाची असते परंतु तसे करण्यात आलेली नाही. ४० लक्ष रुपयात क्रीडांगणाऐवजी जागेचे सपाटीकरण पून्हा करण्यात आलेले आहे. खेळाचा कोणताच प्रकार अशा मातीवर खेळता येवू शकत नाही. खेळाडूंसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात क्रीडांगण व्हायला हवे होते ते झालेले नाही. दौड प्रकारासाठी ट्रक सुध्दा तयार करण्यात आलेले नाहीत. क्रीडा संकुलाच्या दोन इमारती तयार आहेत. शासनाने जाहिर धोरणानुसार तालुका क्रीडा अधिकारी किंवा क्रीडा प्रशिक्षण नियुक्त केलेला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा युवा खेळाडूंना येथे कोण शिकविणार? हा प्रश्न उद्भवत आहे. तालुकास्तरावर क्रीडा संकुलात क्रीडा साहित्य उपलब्ध करण्यात आलेले नाहीत त्यामुळे हया संकुलात कोणत्या खेळाचा सराव करावा ही सुध्दा एक प्रश्नच आहे. तालुकास्तरावर क्रीडा समिती स्थापन करावयाची आहे परंतु तसे झालेले नाही. शासनाचा एवढा मोठा निधी क्रीडा धोरणावर खर्च होत असून एकही खेळाडू तयार होत नाही तरीही लोकप्रतिनिधी गप्प का? असा प्रश्न विचारला जात आहे.