शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

आता पासशिवाय घराबाहेर पडता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदीसह कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कुणीही घराबाहेर निघू नये, असे प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र रस्त्यांवरील गर्दी कमी होताना दिसत नाही. महत्वाच्या कामासाठी आणि जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर निघण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु अनेक जण कोणतेही कारण नसताना रस्त्यावर फिरताना दिसत होते.

ठळक मुद्देकोरोना प्रतिबंध उपाय : नगरपरिषद देणार प्रत्येक कुटुंबाला घरपोच पास, रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी कडक उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाने वारंवार सूचना देवूनही नागरिक नाहक रस्त्यांवर येवून पोलिसांचा ताण वाढवत आहे. गर्दीमुळे कोरोना संसर्गाची अधिक भीती असते. नागरिकांची रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी भंडारा नगरपरिषद प्रत्येक कुटुंबाला पास देणार आहे. निर्धारित दिनांकालाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडता येणार आहे. नगरपरिषद येत्या दोन दिवसात शहरातील प्रत्येक कुटुंबाला ही पास घरपोच देणार आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदीसह कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कुणीही घराबाहेर निघू नये, असे प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र रस्त्यांवरील गर्दी कमी होताना दिसत नाही. महत्वाच्या कामासाठी आणि जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर निघण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु अनेक जण कोणतेही कारण नसताना रस्त्यावर फिरताना दिसत होते. पोलिसांनी विचारल्यास कुणी किराणाचे, कुणी औषधीचे तर कुणी भाजीपाल्याचे कारण सांगत होते. हातात पिशवी घेवून दुचाकीवर रपेट मारणाऱ्या टार्गट तरूणांची संख्याही वाढली होती. पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवूनही कोणी वढणीवर येत नव्हते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेला निर्देश देवून ओळखपत्र वितरणाची सूचना दिली.आता भंडारा शहरात घराबाहेर निघण्यासाठी नगरपरिषदेने दिलेली अधिकृत पासच आवश्यक राहणार आहे. सदर पास प्रत्येक कुटुंबाला नगरपरिषदेचे कर्मचारी घरपोच पोहचून देणार आहे. शहरात २५ हजार मालमत्ताधारक असून त्या प्रत्येकाला ती पास दिली जाईल. यासाठी पासेस नगरपरिषदेचे तयार केल्या असून ३० कर्मचारी दोन दिवसात या पासचे प्रत्येकाकडे वितरण करणार आहे. ही पास घेवूनच बाहेर निघता येणार आहे. या पासवर एक दिवसाआढ घराबाहेर निघण्याची राहणार आहे. घरून निघताना बाहेर निघण्याचे कारण त्यावर नमूद करावे लागेल. तसेच दुकानदाराची स्वाक्षरीही या पासवर घ्यावी लागेल. विशेष म्हणजे या पासवर ज्याचे नाव असेल त्याचा फोटो राहणार आहे. तोच व्यक्ती घराच्या बाहेर निघेल. बाहेर तपासणी करताना संबंधिताना त्याला आपले इतर ओळखपत्रही दाखवावे लागणार आहे. शुक्रवारी या पासचे वितरण शहरातील काही भागात नगरपरिषदेचे अभियंता नागेश कपाटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. येत्या दोन दिवसात सर्वांना ही पास वितरित करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.्रपास देताना महिलांच्या नावांना प्राधान्यजीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर निघताना आता पास सक्तीची करण्यात आली आहे. नगरपरिषद पास वितरीत करताना कुटुंबातील महिलेच्या नावाला प्राधान्य देणार आहे. सदर पासवर पासधारकाचे नाव, कुटुंबातील व्यक्तीची संख्या, पत्ता, छायाचित्र असून त्यावरच एक दिवसा आढची तारीख मुद्रीत करण्यात आलेली आहे. एका कुटुंबाला २८ मार्च रोजी बाहेर जाण्याची परवानगी असेल तर त्याला दुसºया दिवशी घराबाहेर निघता येणार नाही. तर एक दिवस आढ म्हणजे ३० तारेखला घराबाहेर केवळ खरेदीसाठीच निघता येणार आहे. तारखेप्रमाणे बाहेर येणाºयावर कारवाई करणार आहे.सहा ठिकाणी भरणार भाजी बाजारभंडारा शहरात वरठी रोडवरील टाकळी येथील आयटीआयसमोर, शास्त्री चौकातील दसरा मैदान, खात रोडवरील रेल्वे ग्राऊंड, गांधी चौकात छोटा बाजार, पोस्ट ऑफिस चौकात बडा बाजार, राजीव गांधी चौकात गणेश विद्यालय आणि मुस्लिम लायब्ररी चौकात तुरस्कर गार्डनमध्ये भाजीपाला बाजार भरविला जाणार आहे. सामाजिक अंतर ठेवून हा बाजार भरविला जाणार असून नगरपरिषदेचे आखून दिलेल्या ठिकाणीच विक्रेत्यांना आपल्या साहित्याची विक्री करावी लागणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसराच्या जवळील बाजारातूनच खरेदी करावी, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस