गोपालकृष्ण मांडवकर, लोकमत न्यूज नेटवर्क, भंडारा : देशभरात एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरसाठी रांगा लागलेल्या असताना लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोहळी हे गाव मात्र अगदी निर्धास्त आहे. ना गॅस संपल्याची चिंता, ना रांगेत उभारण्याची गरज! याला कारण म्हणजे, या गावात १९८७ पासून गोबरगॅस-बायोगॅसचा वापर गावकरी करीत आहेत. पारंपरिक ऊर्जा वापरातून स्वयंपूर्ण झालेल्या या गावाने यातून जगासमोर आदर्श घालून दिला आहे. रेंगेपार, चिचटोला या गावांची गट ग्रामपंचायत आहे.
कुऱ्हाडबंदी अन् गरम पाणी : कुऱ्हाडबंदी लागू केली. गरम पाण्यासाठी ग्रामपंचायतीने सोलर वॉटर हिटर बसवले आहेत.
गाव आहे पुरस्कारप्राप्त
रेंगेपार कोहळी या गावाची वेगळी ओळख म्हणजे, हे गाव दंडार या लोककलेसाठी झाडीपट्टीत प्रसिद्ध आहे. रेंगपार कोहळीच्या दंडारीला अनेक राज्यस्तराचे पुरस्कारही मिळाले आहेत. २०१०-११ या वर्षी गावाला ग्रामस्वच्छता अभियानात राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावरही लाखोंचे पुरस्कार मिळाले आहेत. २०१९ मध्ये स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत ५० लाखांचा पुरस्कार मिळाला.
शासकीय योजनेतून गाव कसे आत्मनिर्भर होऊ शकते, हे आमच्या गावाने या गॅसटंचाईच्या काळात सिद्ध केले आहे. योजनांची जाण गावाच्या विकासासाठी महत्त्वाची ठरली आहे.- मनोहर बोरकर, सरपंच, रेंगेपार कोहळी
Web Summary : Rengepar Kohali village uses biogas since 1987, eliminating gas cylinder dependence. Solar water heaters and forest conservation add to self-sufficiency. The award-winning village demonstrates how government schemes can foster self-reliance.
Web Summary : रेंगेपार कोहाली गांव 1987 से बायोगैस का उपयोग कर रहा है, जिससे गैस सिलेंडर पर निर्भरता खत्म हो गई है। सौर वॉटर हीटर और वन संरक्षण आत्मनिर्भरता को बढ़ाते हैं। पुरस्कार विजेता गांव दर्शाता है कि सरकारी योजनाएं कैसे आत्मनिर्भरता को बढ़ावा दे सकती हैं।