निलज-कारधा रस्त्याचे पालटणार रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:39 IST2018-03-26T23:39:58+5:302018-03-26T23:39:58+5:30
पर्यटनासाठी पवनी तालुका देश-विदेशात प्रसिद्ध आहे. परंतु दळणवळणाचा प्रमुख मार्ग असलेला निलज-कारधा राज्यमार्ग अरूंद असल्याने वाहतुकीस अडथळ्याचा आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने राज्य मार्गाची दखल घेवून निलज-कारधा रस्त्याची दर्जाेन्नती करण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे पवनीच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

निलज-कारधा रस्त्याचे पालटणार रूप
अशोक पारधी ।
आॅनलाईन लोकमत
पवनी : पर्यटनासाठी पवनी तालुका देश-विदेशात प्रसिद्ध आहे. परंतु दळणवळणाचा प्रमुख मार्ग असलेला निलज-कारधा राज्यमार्ग अरूंद असल्याने वाहतुकीस अडथळ्याचा आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने राज्य मार्गाची दखल घेवून निलज-कारधा रस्त्याची दर्जाेन्नती करण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे पवनीच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
पवनी शहर प्राचीन व ऐतिहासिक नगर म्हणून गेल्या कित्येक शतकापासून महाराष्ट्राच्या नकाशावर झळकत आहे. भारतीय पुरातत्व विभागाने सन १९६९-७० मध्ये केलेल्या उत्खननात ईसापूर्व ४ च्या शतकातील महास्तुप शोधून काढला तेव्हापासून प्राचीन शहर म्हणून नगराची खरी ओळख पटली. त्यानंतर रूयाळ-सिंदपुरी येथे महासमाधीभीूमीची निर्मिती झाली आणि पवनीचा नाव आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचला. तालुक्यात घनदाट जंगल असल्याने वाघ, अस्वल, हरिण, निलगाय, बिबट असे प्राणी व विविध प्रकारचे पक्षी पूर्वीच होते परंतू उमरेड-कºहांडला-पवनी अभयारण्य मंजूर केल्यामुळे घनदाट जंगल पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले. राष्ट्रीय गोसेखुर्द प्रकल्प, नगरातील पंचमुखी गणेश, विदर्भातील अष्ठविनायकापैकी एक आहे. थरगीधर गणेश, रांझीचा गणपती, वैजेश्वर मंदीर, मुरलीधर मंदिर, चंडिका माता मंदिर असे प्रसिद्ध असलेले देवदेवतांचे मंदिर, भरूडस्तंभ, वैनगंगा नदीवर असलेले दिवाणघाट, वैजेश्वर घाट, पानखिडकी असे प्रसिद्ध घाट, भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेला जवाहर गेट व परकोट असे विविध स्थळ पर्यटकांना खुणावतात परंतु रस्ते आणि पर्यटकांसाठी परिसरात अल्प प्रमाणात असलेली निवास व्यवस्था यामुळे एकतर पर्यटक कमी संख्येने येतात.पर्यटकांची गैरसोय लक्षात घेवून पहिल्या हप्त्यात राज्यमार्गाची दर्जाेन्नती करण्याचा निर्णय राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने घेतला. निलज कारधा राज्यमार्ग १० मीटर रूंदीचा तयार करण्यात येणार आहे व त्याला राष्ट्रीय महामार्ग असा दर्जा प्राप्त होणार आहे.