पदभरतीची नव्याने निवडसूची तयार करावी

By Admin | Updated: July 22, 2015 01:14 IST2015-07-22T01:14:22+5:302015-07-22T01:14:22+5:30

फक्त दहावीत मिळालेल्या गुणाच्या आधारे विद्युत सहाय्यक पदाकरिता निवड सूची तयार करण्यात आल्याचा अजब प्रकार महावितरण विभागात घडला आहे.

A new selection list should be made for recruitment | पदभरतीची नव्याने निवडसूची तयार करावी

पदभरतीची नव्याने निवडसूची तयार करावी

महावितरणचा प्रताप : वाघमारे यांची सूचना
तुमसर : फक्त दहावीत मिळालेल्या गुणाच्या आधारे विद्युत सहाय्यक पदाकरिता निवड सूची तयार करण्यात आल्याचा अजब प्रकार महावितरण विभागात घडला आहे. ही बाब लक्षात येताच ती निवड सूची रद्द करून दहावी तसेच आय.टी.आय. मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर नव्याने निवड सूची तयार करण्यासंदर्भात आमदार चरण वाघमारे यांनी महावितरण विभागाला सूचना दिल्या आहे.
विद्युत सहायक हे पद तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित असताना पदभरतीकरिता फक्त दहावीत मिळालेल्या गुणांचाच विचार करणे योग्य नसून दहावी तसेच आय.टी.आय. द्वारा घेतलेल्या तांत्रिक अभ्यासक्रमात मिळविलेल्या गुणांचा आधार घेऊनच पदभरती करिता निवड यादी तयार होणे गरजेचे आहे. मात्र, महावितरण विभागाने प्रशिक्षणार्थिंची दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारावर निवड यादी तयार केल्याने अनेक बेरोजगार युवकांना वंचित ठेवल्या गेल्याने आमदार चरण वाघमारे यांनी महावितरणला सूचना दिल्या आहे.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्राद्वारे कळवून तालुक्यातील बेरोजगार युवकांवर झालेला अन्याय दूर करून न्याय देण्यासंबंधात ही विनंती केली. सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. (शहर प्रतिनिधी)

Web Title: A new selection list should be made for recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.