विदर्भ साहित्य संघाच्या भंडारा शाखेची नवी कार्यकारिणी
By Admin | Updated: April 26, 2016 00:30 IST2016-04-26T00:30:06+5:302016-04-26T00:30:06+5:30
विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या पुनर्रचनेनंतर भंडारा जिल्हा शाखेचीही नव्याने पुनर्रचना करण्यात आली.

विदर्भ साहित्य संघाच्या भंडारा शाखेची नवी कार्यकारिणी
भंडारा : विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या पुनर्रचनेनंतर भंडारा जिल्हा शाखेचीही नव्याने पुनर्रचना करण्यात आली. १० एप्रिल २०१६ रोजी वर्तमान अध्यक्ष अॅड. सुधीर गुप्ते यांच्या अध्यक्षतेत भंडारा शाखेची आमसभा सार्वजनिक वाचनालयात संपन्न झाली.
या आमसभेत भंडारा शाखेची नवी कार्यकारिणी गठित करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून धनंजय दलाल, अॅड. सुधीर गुप्ते, नीलकंठ रणदिवे, शाखाध्यक्ष प्राचार्य डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे, उपाध्यक्ष प्रा. सुमंत देशपांडे, सचिव प्रमोदकुमार अणेराव, सहसचिव प्रदीप गादेवार, कोषाध्यक्ष हर्षल मेश्राम, कार्यक्रम प्रमुख डॉ. अनिल नितनवरे, सदस्य विशाखा गुप्ते, जयकृष्ण बावनकुळे, प्रा. विनोद मेश्राम, ताराचंद ठवकर, विनोद आकरे तसेच विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सभासद डॉ. अनिल नितनवरे यांच्याकडे युगवाणी या विदर्भ साहित्य संघाच्या मुखपत्राच्या संपादनाची जाबाबदारी सोपविण्यात आली आहे.