जनावरांचे संगोपन करण्याची गरज

By Admin | Updated: February 10, 2016 00:39 IST2016-02-10T00:39:47+5:302016-02-10T00:39:47+5:30

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी पशुपालन करणे गरजेचे आले. पशुपालनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढते.

The need to rear cattle | जनावरांचे संगोपन करण्याची गरज

जनावरांचे संगोपन करण्याची गरज

नरेश डहारे यांचे प्रतिपादन : आजगाव येथे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी
पालोरा : शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी पशुपालन करणे गरजेचे आले. पशुपालनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढते. मात्र सध्याला पाण्यापेक्षाही दुधाला अल्पभाव असल्यामुळे शेतकऱ्यांना बालगोपालांना जनावरांचे पालनपोषण करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जनावरांचे वैरण शेतात पेरून जनावरांचे पालन व संगोपन करावे असे जिल्हा परिषदेचे नरेश डहारे यांनी प्रतिपादन आजगाव येथील तालुकास्तरीय पशु प्रदर्शनी कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले
पवनी पशुवैद्यकीय कार्यालय अंतर्गत आजगाव येथील मार्कड स्टेडीयम येथे एक दिवसीय तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
पशुपक्षाचे उत्कृष्ट प्रकारे संगोपन करण्यासाठी या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी व उत्कृष्ट संगोपन करणाऱ्या पशुपालकांना बक्षिस वितरणाकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत पशुपक्ष्यांचे १० गट पाडण्यात आले होते.
यात प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षिसांचे पाहुण्यांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. या प्रसंगी सभापती नरेश डहारे मह्णाले, ज्या प्रमाणे दुधाचे भाव कमी प्रमाणात आले.
या दुधावर अनेक उद्योगपती कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करीत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जनावरांच्या खाद्याचे भाव गगनात भिडले आहे.
मात्र दुधाला पाण्याचे भाव आले ही एक शोकांतिका आहे. पशुपालनाकरिता बालगोपालांसाठी प्रशासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांनी व बालगोपानी घ्यावा व आपला आर्थिक विकास साधावा.
कार्यक्रमाचे उद्घाटक पंचायत समिती सभापती अर्चना वैद्य या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सभापती नरेश डहारे हे होते.
मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, खंड विकास अधिकारी पवनी एस.के. भगत, आजगाव येथील सरपंच राजेश भेंडारकर, पंचायत समिती सदस्य मंगेश ब्राह्मणकर, दुग्ध सह. संस्था आजगावचे सदस्य विनायक कोरे, क्रिष्णा साकरकर, व आदी पाहुणे उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी २८ पशुपक्षी पालकांना उत्कृष्ट बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक़माचे प्रास्ताविक पशु विकास वैद्यकीय अधिकारी ए.जी. ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.रेहपाडे यांनी तर आभार डॉ.जी.के. गभने यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: The need to rear cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.