शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
"घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
5
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
6
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
7
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
8
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
9
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
11
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
12
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
13
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
14
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
15
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
16
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
17
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
18
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
19
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
20
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांगीण विकास कार्यक्रमाला लोकसहभागाची गरज

By admin | Updated: July 16, 2014 00:00 IST

आदिवासी कुटूंबाची भरीव सुधारने करीता वाडी प्रकल्प सुरू केला आहे. लोकांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर विकास कार्यक्रमाला लोक सहभागाची गरज आहे, असे विचार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी

भंडारा : आदिवासी कुटूंबाची भरीव सुधारने करीता वाडी प्रकल्प सुरू केला आहे. लोकांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर विकास कार्यक्रमाला लोक सहभागाची गरज आहे, असे विचार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी वाडी प्रकल्प उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले.
तुमसर तालुक्यातील आलेसुर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणावर नाबार्ड द्वारा पुरस्कृत ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाद्वारे वाडी प्रकल्प उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भंडारा नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अरविंद खापर्डे हे होते. प्रमुख पाहुणे ओलसूरचे सरपंच हेमराज मेहर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. सजिव गजभिये, अविल बोरकर, पृथ्वीराज शेंडे, प्रकल्प समन्वयक योगेशकुमार टेंभरे, आलेसूर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज हाळगे, रामचंद्र करमकर, ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम सलामे उपस्थित होते.
द्विवेदी म्हणाले, वाडी हा प्रकल्प नसून दिर्घकाळ विकास साधणारा कार्यक्रम आहे. याची यशस्वीता गाठण्यासाठी लोकांचे योगदान महत्वाचे आहे. सहभागी घटकांनी संपूर्ण प्रक्रिया समजून घेवून नियोजन करावे, असा सल्ला याप्रसंगी दिला. हा प्रकल्प १० आदिवासी गावात राबविण्यात येत आहे. यासर्व गावात संपूर्ण विकास कर्मीचे समन्वय साधून सर्व योजना एकत्रित राबविण्याचे याप्रसंगी आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाला गोंडीटोला, चिखली, आसलपाणी, कारली, लेंढेझरी, गणेशपूर, गायमुख, लवादा, विटपूर, खापा या प्रकल्प कार्यक्षेत्रातील १० गावाचे शेतकरी व महिलांची उपस्थिती होती. संचालन पृथ्वीराज शेंडे, प्रास्ताविक अविल बोरकर, आभार टेंभरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी जगन्नाथ कटरे, जियालाल रहांगडाले, निखिल सावंतवान, निर्मला उईके, संजय सोनवने, सुरेंद्र पेंदाम, राधेश्याम कंगाले, हरीप्रसाद वाडवे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)