तरुणांनी मैदानी खेळाकडे वळणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:14 AM2019-09-02T00:14:17+5:302019-09-02T00:15:08+5:30

व्यायामामुळे शारीरिक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमीना वाढतो. तुम्ही जर मोबाईल चार्जींग केले नाही तर तुमचा मोबाईल फोन चालेल का? अगदी तसेच शरीराला मनाला डोक्याला रिचार्ज करण्यासाठी कमीत कमी दररोज ३० मिनिटे गावातील आखाडा किंवा व्यायाम शाळेला भेट देणे आवश्यक आहे.

The need of the hour for youngsters to turn to outdoor play | तरुणांनी मैदानी खेळाकडे वळणे काळाची गरज

तरुणांनी मैदानी खेळाकडे वळणे काळाची गरज

Next
ठळक मुद्देदेवीदास वैरागडे : चिचाळ येथे कुस्त्यांची आमदंगल, ३० पहेलवानांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ : तरुणांनी ग्रामीण भागातील मैदानी खेळ कुस्त्यांकडे वळले पाहिजे. शरीराला स्थिरता प्राप्त करण्यासाठी शरीर मजबूत बनविण्यासाठी बल वाढविण्यासाठी केल्या जाणाऱ्या क्रियेस व्यायाम म्हणतात. व्यायामामुळे शारीरिक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमीना वाढतो. तुम्ही जर मोबाईल चार्जींग केले नाही तर तुमचा मोबाईल फोन चालेल का? अगदी तसेच शरीराला मनाला डोक्याला रिचार्ज करण्यासाठी कमीत कमी दररोज ३० मिनिटे गावातील आखाडा किंवा व्यायाम शाळेला भेट देणे आवश्यक आहे. एकदा व्यायामाची सवय लागली की व्यायाम हा दैनंदिन जीवनाचा भाग होऊन जाईल, असे प्रतिपादन अ‍ॅड. देवीदास वैरागडे यांनी केले.
चिचाळ येथे आयोजित कुस्त्यांचे आमदंगल उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जयराम दिघोरे, सोमा लोहकर, रामकृष्ण वैरागडे, शंकर मांडवकर, देवनाथ वैद्य, मुखळू वैद्य, वासुदेव लेंडे, देवराव वाघधरे, ईश्वर वैद्य, मनोज वैरागडे, जगतराम गभणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वैरागडे म्हणाले, आखाड्यातील व्यायामाने शरीरातील सांधे लवचिक बनविण्यासाठी शरीर निरोगी राखण्यासाठी, शरीराचा आकार, बांधेसुद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन. आखाड्यात नियमित सराव केल्याने शारीरिक हालचालींना उपयोगी पडणारे स्नायू सक्षम होतात. योगासने, प्राणायाम आणि व्यायाम, ध्यान, धारणा ही सर्व मानसिक ताण तणाव नाहिसा करण्यास उपयुक्त ठरत असल्याचे म्हणाले.
या आखाड्यात पंचक्रोशीतील व परजिल्ह्यातील ३० मल्लांच्या कुस्तीचे प्रदर्शन दाखविण्यात आले. यामध्ये दिनेश घोडके, सात्वीक जिभकाटे, निकेश हातेल, कमलेश काटेखाये, सौरभ घोनमोडे, वैभव बिलवणे, अरविंद ठाकरे, कार्तीक चाचेरे, अभय सार्वे, साहिल जिभकाटे, ताराचंद्र पडोळे, ढेकल डायरे आदी मल्लांनी हजेरी लावली होती.
विजयी मल्लांना स्मृतीचिन्ह, बनियान, टॉवेल व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून जयराम दिघोरे, ईश्वर वैद्ये, देवराम वाघधरे यांनी सांभाळले. कार्यक्रमाचे संचालन यशवंत लोहकर व आभार परशुराम दिघोरे यांनी केले. यावेळी कुस्तीशौकीनांनी एकच गर्दी केली होती.

Web Title: The need of the hour for youngsters to turn to outdoor play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.