इतिहासातील कर्तबगार महिलांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:46 IST2019-01-12T21:46:22+5:302019-01-12T21:46:46+5:30
भारताला तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान, साहित्य, राजनिती, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठा वारसा लाभला आहे. भारतीय महिला स्वातंत्र्य सेनानी, खेळाडू, शास्त्रज्ञ, समाजसेविका, अभिनेत्री आणि नेत्यांनी भारताचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविले आहे.

इतिहासातील कर्तबगार महिलांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ : भारताला तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान, साहित्य, राजनिती, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठा वारसा लाभला आहे. भारतीय महिला स्वातंत्र्य सेनानी, खेळाडू, शास्त्रज्ञ, समाजसेविका, अभिनेत्री आणि नेत्यांनी भारताचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविले आहे. अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, रमाई, सायना, नेहवाल, साक्षी मलीक अशा काही इतिहासातील आणि अलीकडच्या कर्तबगार महिलांचा आदर्श ठेवा, असे प्रतिपादन शिवशाहीर लक्ष्मण मोकासरे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना महिला व बालविकास विभाग अंतर्गत जयभवानी कलापथक मंडळ औरंगाबाद, शिवशाहीर लक्ष्मण मोकासरे व शाहीर कार्तीक मेश्राम यांच्या वतीने मुलगी वाचवा, मुलगी शिकवा लोकपथक ग्रामपंचायत चौक चिचाळ येथे सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लोपमुद्रा वैरागडे होत्या. यावेळी उपसरपंच मंजुषा गभणे, जयराम दिघोरे, प्तुकेश वैरागडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण काटेखाये, मोना तिभागेवार, वर्षा काटेखाये, भूमिका लोहकर, गंगू मांडवकर, जिभकाटे, पडोळे, रुपचंद उके आदी उपस्थित होते.
शाहीर कार्तीक मेश्राम कलापथकातून म्हणाले, समाजाचा समतोल राखण्यासाठी घटत चाललेला कन्या जन्मदर रोखणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी स्त्री भ्रूण हत्या, बालविवाह लैंगिक भेदभाव, हुंडाबळी या सारख्या समस्यांचा विनाश केला पाहिजेत असे कलापथकातून पोवाळे, नृत्य गीतांची सादरीकरणाद्वारे उपस्थितांना पटवून दिले. कार्यक्रमाला विद्यार्थिनी, महिला बचत गट, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस व गावातील महिला उपस्थित होत्या.