यशासाठी ध्येयाची गरज
By Admin | Updated: September 9, 2014 23:16 IST2014-09-09T23:16:38+5:302014-09-09T23:16:38+5:30
जीवनात यश संपादन करण्यासाठी सुरुवातीला ध्येय ठरविणे आवश्यक आहे. ध्येय ठरविल्यानंतर त्यासाठी चिकाटी, जिद्द, कठोर परिश्रम, करणे गरजेचे आहे. स्वत:चे जीवन यशस्वी करणे हे त्या व्यक्तीच्याच हातात असते.

यशासाठी ध्येयाची गरज
भंडारा : जीवनात यश संपादन करण्यासाठी सुरुवातीला ध्येय ठरविणे आवश्यक आहे. ध्येय ठरविल्यानंतर त्यासाठी चिकाटी, जिद्द, कठोर परिश्रम, करणे गरजेचे आहे. स्वत:चे जीवन यशस्वी करणे हे त्या व्यक्तीच्याच हातात असते. त्यासाठी स्वत: मेहनत करावी लागते. प्रशासकीय सेवेतून जो मानसन्मान मिळतो तो इतर कुठेही मिळत नाही. आजचे युग हे संगणकाचे युग आहे. त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर सावधानपूर्वक वापर करा, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक कैलाश कणसे यांनी केले.
जे.एम. पटेल महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून नाथे करिअर अकादमी नागपूरचे संजय नाथे, जे.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.राहुल मानकर उपस्थित होते.
यावेळी डॉ.विकास ढोमणे म्हणले, जीवनात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट मार्गाचा वापर करू नये. जर शॉर्टकट मार्गाचा वापर केल्यास पाहिजे ते यश संपादन करू शकत नाही. तसेच महाविद्यालयात जवळपा ४५ कोर्सेस चालविले जातात. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून येण्यासाठी सर्व सोयीसुविधा महाविद्यालयामध्ये करण्यात आलेल्या आहेत.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा.शैलेश वसानी यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रा.विशाखा वाघ यांनी करुन दिला. आभारप्रदशरन दिव्या कटकवार यांनी केले. कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागातील प्रा.प्रशांत वाल्देव, प्रा.डॉ.आनंद मुळे, प्रा.धनराज घुबडे, प्रा.प्रशांत निमजे, प्रा.तृप्ती राठोड, प्रा.प्रशांत गायधने, प्रा.नंदिनी मेंढे तसेच मनोहर पोटफोडे, घनश्याम चकोले, विनोद नक्षूलवार तसेच वाणिज्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष सोमेश्वर बोंदरे व वाणिज्य अभ्यास मंडळाचे सचिव रोशनी मेघवाणी, स्नेहा रॉय, अमर गेडाम, रॉबीन सोनटक्की, निलेश लिल्हारे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)