माणूस घडविण्याचे शिक्षण देण्याची गरज
By Admin | Updated: July 22, 2015 01:16 IST2015-07-22T01:16:37+5:302015-07-22T01:16:37+5:30
माणूस द्या, मज माणूस द्या, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संदेश दिल्याचा ग्रामगीतेत उल्लेख आहे. इंजिनियर, डॉक्टर तयार करणे ही जरी गरज असली तरी, ....

माणूस घडविण्याचे शिक्षण देण्याची गरज
गुणवंतांचा सत्कार : प्रकाश कोल्हे यांचे प्रतिपादन
तुमसर : माणूस द्या, मज माणूस द्या, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संदेश दिल्याचा ग्रामगीतेत उल्लेख आहे. इंजिनियर, डॉक्टर तयार करणे ही जरी गरज असली तरी, योग्य संस्कारक्षम माणूस घडविण्याचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिक्षण उपनिरीक्षक प्रकाश कोल्हे यांनी केले. ते जनता विद्यालयात आयोजित इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची वेलकम पार्टी, इयत्ता १० वी १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार तथा पालक मेळावा कार्यक्रमात बोलत होते.
अध्यक्षस्थानी सेवानिवृत पशुवैद्यकीय सहउपसंचालक डॉ. कृपाचार्य बोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थाध्यक्ष दिलीप बोरकर, उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार, गटशिक्षणाधिकारी सी.आर. नंदनवार, प्राचार्य हेमंत केळवदे, पर्यवेक्षक एस.एन. लंजे, मस्के उपस्थित होते. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करण्याची गरज विशद केली. गटशिक्षणाधिकारी नंदनवार तथा डॉ.कृपाचार्य बोरकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालन विज्ञान शिक्षक रंजनकुमार डे तर आभार पी.एम. नाकाडे यांनी मानले. याप्रसंगी शिक्षकवृंद प्रा.पंकज बोरकर, जवाहर दमाहे, जितेन्द्र नागपुरे, मते, बिसने, बावनकर, कटरे, आरामे, प्रा.शशीकला पटले, राजू गभणे, भोजराज येवले, डी.एस. गायकवाड, वाय.एच. बोपचे, प्रा.डी.एन. कापगते, प्रा.विद्यानंद भगत, प्रा.नीळकंठ कापगते, प्रा.गणेश चाचीरे, प्रा.आशिष खोब्रागडे, प्रा.नितीन पाटील, सुनिल नासरे, सोमा कापगते, वाय.आर. कापगते, शरद भेलकर, किशोर दिघोरे, गोविंद वासनिक, धर्मेंद्र कोचे, माया बोरकर, विद्या बोरकर, चकोलेसह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालकवर्ग उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)