लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : महिलांनी कुणावरही निर्भर न राहता स्वत:च्या विकासासाठी स्वत:च प्रयत्न करावे. महिलांकडे असलेल्या सृजनशीलतेचा वापर करुन नवसमाज निर्मितीच्या कार्यात हातभार लावावे असे प्रतिपादन जिल्हा परीषदच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी केले.आधुनिक शिक्षणाच्या युगात महिलांनी विविध क्षेत्रात भरारी घेतली असली तरी महिलाविषयक हक्क व सुरक्षा विषयक कायद्यापासून त्या आजही दूर आहेत. तसेच सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात महिलांचा सहभाग वाढावा, या हेतुने जिजाऊ ब्रिगेड भंडारा तर्फे तुमसर येथे जिल्हास्तरीय महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या विभागिय अध्यक्षा सुनिता जिचकार होत्या. यावेळी मार्गदर्शक म्हणून राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक अॅड. वैशाली केळकर, डॉ. मनीषा म्हैसकर, श्रीकांत बरिंगे उपस्थित होते.सुनिता जिचकार म्हणाल्या, जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांचे वैचारिक सक्षमीकरण करुन, धार्मिक गुलामीतून मुक्त करण्याचे प्रयत्न केल्या जात आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याची माहिती देऊन, ढोंगी बुवाबाजी पासून दूर राहावे. अॅड. वैशाली केळकर यांनी महिलांचे हक्क आणि सरंक्षण विषयक कायद्याविषयी मार्गदर्शन केले.श्रीकांत बरिंगे यांनी महिलांनी वैज्ञानिक विचार स्विकारावा, धार्मिक कर्मकांडात न गुरफटता स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याकरिता, जिजाऊ, सवित्री, रमाई, अहिल्याताई होळकर यांचे कार्य समोर ठेवून विविध क्षेत्रात कार्य करावे, जिजाऊंनी जसे शिवबाला घडविले तसेच अन्याय अत्याचारा विरुद्ध लढणारा आधुनिक शिवबा घडवावा, असे प्रतिपादन केले.या परिषदेला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल भुसारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्याणी भुरे, कुसुम कांबळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिशुपाल भुरे, मुख्याध्यापिका प्रीति पडोळे, रेखा कोंडेवार, शांता बावनकर, पंचायत समिती सभापती रोशना नारनवरे, पंकज घाटे, राहुल डोंगरे, चंद्रकांत लांजेवार उपस्थित होते.परिषदेत महिलांकरिता प्रबोधनपर कार्यक्रमा व्यतिरिक्त सामाजिक परिवर्तनाचा दृष्टिकोण निर्माण करणारे नृत्य, क्रांतिकारी गित व लावणी सादर करण्यात आले. या कार्यक्रमांचा अनेकांनी लाभ घेतला.प्रस्ताविक जिजाऊ ब्रिगेडचे प्रतिमा लांडगे यांनी केले. संचालन नीतू घटारे व सुलभा हटवार यांनी तर, आभार प्रदर्शन हिरा बोन्द्रे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रीती भोयर, सुगंधा डोंगरे, शितल टांगले, अंजली उताणे, रत्नमाला मने, कल्पना चामट, स्मिता येवले, उमा काळे, हिरण्यमयी साखरवाडे, सुनिता टेंभूर्णे, ललिता शेंडे, डॉ. प्रियदर्शनी सहारे, रुपाली खराबे, शालिनी बागडे, सिमा झंझाड, स्नेहल घाटे, रुपाली भुरे, नेमिता राहटे, बाली सार्वे, कल्याणी चोपकर, चंदा ढेंगे यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
नवसमाज निर्मितीसाठी पुढाकार गरजेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:42 IST
महिलांनी कुणावरही निर्भर न राहता स्वत:च्या विकासासाठी स्वत:च प्रयत्न करावे. महिलांकडे असलेल्या सृजनशीलतेचा वापर करुन नवसमाज निर्मितीच्या कार्यात हातभार लावावे असे प्रतिपादन जिल्हा परीषदच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी केले.
नवसमाज निर्मितीसाठी पुढाकार गरजेचा
ठळक मुद्देमंजुषा ठवकर : जिजाऊ ब्रिगेडतर्फे तुमसर येथे जिल्हास्तरीय महिला परिषद