नायब तहसीलदारांचे पद रिक्त

By Admin | Updated: June 3, 2014 23:53 IST2014-06-03T23:53:15+5:302014-06-03T23:53:15+5:30

लहान राज्यांची कल्पना साकारुन विकास नजरेसमोर ठेवून लाखनी तालुका तयार करण्यात आला. मात्र निर्धारित कर्मचारीगण, स्वतंत्र इमारत, खर्चाची तरतूद शासनाने न केल्याने लाखनी तहसील

Nayab tehsildar's post vacant | नायब तहसीलदारांचे पद रिक्त

नायब तहसीलदारांचे पद रिक्त

अनुशेष कायम : तहसीलदारांवर कामाचा ताण, लाखनी तालुक्यातील प्रकार
पालांदूर :  लहान राज्यांची कल्पना साकारुन विकास नजरेसमोर ठेवून लाखनी तालुका तयार करण्यात आला. मात्र निर्धारित कर्मचारीगण, स्वतंत्र इमारत, खर्चाची तरतूद शासनाने न केल्याने लाखनी तहसील कार्यालय संकटात आले आहे.  कर्मचार्‍याचा वाणवा अधिकच वाढल्याने जनतेची कामे रेंगाळत आहेत.
लाखनी तालुक्याला बारा वर्षे होऊनही  शासकीय नियमानुसार कर्मचारीगण उपलब्ध नसल्याने जनतेला वारंवार तहसील कार्यालयाच्या फेर्‍या माराव्या लागतात. हल्ली नायब तहसीलदाराची एकही जागा भरली नसल्याने कामाचा खोळंबा झाला आहे.
निवडणूक विभाग, संजय गांधी-इंदिरा गांधी, वयोवृद्ध पेन्शनरला दरमहा दोन कोटीचे वाटप केल्या जाते. पण या टेबलला एकही कर्मचारी गण नसल्याने कामावरील कर्मचार्‍यांना कामाचा ताण वाढतच असल्याचे दृश्य आहे.
संगणकाच्या दुनियेत आपण शिरकाव केला असला तरी शासनाच्या उदासीन धोरणाने लाखनी तहसील कार्यालयाला संगणक मिळालाच नसून कार्यालयीन खर्चाची तरतूदसुद्धा नसल्याने प्रशासन चालवायला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे तहसीलदार सर्मथ यांनी पालांदूर भेटीत लोकमतकडे व्यक्त केले.
जनतेचे सेवा करण्याची मनोमन इच्छा आहे, पण कामाचा व्यापच अधिक असल्याने जनतेला त्रास सहन करावाच लागतो. तरीपण शक्य तितक्या प्रयत्नांनी गारपीटग्रस्तांना अतवृष्टीग्रस्तांना मदत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
गारपीटग्रस्त २८ गावांना ३४३२ लाभार्थ्यांंना ६८,३२,७४0 रुपयाचे एनएफटीच्या माध्यमातून वाटप करण्यात आले.
शेतीच्या नुकसानीत ३९ गावात ४२५८ शेतकर्‍यांना ३ कोटी २२ लक्षाचे एनएफटीच्याद्वारे वाटप करण्यात आल्याची माहिती आहे.
मागील खरिपात आलेल्या अतवृष्टीचे ४ कोटी ६0 लाख वाटप झाले असून खाते क्रमांकाच्या चुकीने  वाटप रेंगाळले असून वाटप सुरूच असल्याचे तहसीलदार सर्मथ यांनी सहजरीत्या कामात दिरंगाई नसल्याचे स्पष्ट केले.
लाखनी तहसील कार्यालयाची  इमारत सज्ज आहे, परंतु प्रवेशाचा मुहूर्त राजकारणात अडकला आहे. परिणामी कार्यालय जसे आहे तिथेच त्याच स्थितीत चालवत आहोत.  जनतेची मागणी रेटून धरुन  शासनाला गळ घातली, तर बरे होईल, अशी आर्त अपेक्षा सर्मथ यांनी बोलून दाखविली आहे.
लोकप्रतिनिधींनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासात्मक बाजूने विचार करुन लाखनी तालुक्याला कामानुसार कर्मचारीगण उपलब्ध करुन द्यावे व नियोजित इमारतीत कार्यालय त्वरित नेण्यात यावे, अशी लाखनी तालुक्यातील जनतेची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Nayab tehsildar's post vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.