नवोदय विद्यालयाविना जिल्हा झाला पोरका

By Admin | Updated: December 27, 2015 00:57 IST2015-12-27T00:57:21+5:302015-12-27T00:57:21+5:30

भंडारा जिल्ह्याचे विभाजन झाले. अन् जिल्ह्यातील साकोली येथील एकमेव नवोदय विद्यालय गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथे हलविण्यात आले.

Navodaya Vidyalaya without the district of Porca | नवोदय विद्यालयाविना जिल्हा झाला पोरका

नवोदय विद्यालयाविना जिल्हा झाला पोरका

१९९९ मध्ये जिल्हा विभाजनात भंडारा जिल्ह्याला फटका
संजय साठवणे साकोली
भंडारा जिल्ह्याचे विभाजन झाले. अन् जिल्ह्यातील साकोली येथील एकमेव नवोदय विद्यालय गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथे हलविण्यात आले. मात्र तेव्हापासून भंडारा जिल्ह्यात अद्यापही नवोदय विद्यालयाची निर्मिती झाली नाही. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थी नवोदय विद्यालयापासून वंचित आहेत.
केंद्र सरकारने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन खुले करून शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या नावाने नवोदय विद्यालय स्थापन करण्याची योजना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अमलात आणली. मात्र भंडारा जिल्ह्याच्या विभाजनानंतर जिल्ह्यातील नवोदय विद्यालय गोंदिया जिल्ह्याच्या वाट्याला गेले. त्यामुळे हा जिल्हा नवोदय विद्यालयापासून पोरका झाला आहे.
केंद्र सरकारने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नि:शुल्क उच्च शिक्षण मिळावे म्हणून १९९५ पासून प्रत्येक जिल्हास्तरावर जवाहर नवोदय विद्यालय स्थापन करण्याची योजना अमलात आणली. या योजनेनुसार भंडारा जिल्ह्याचे नवोदय विद्यालय १९९६ मध्ये साकोली येथील बाजार चौकात असलेल्या कन्या विद्यालयाच्या इमारतीत सुरु करण्यात आली.
मात्र जागा अपुरी पडत असल्याच्या कारणावरून ही नवोदय विद्यालय हलविण्याचा प्रस्ताव शासनस्तरावरून मंजूर करण्यात आला व अखेर १९९८ वर्षअखेर हे जवाहर नवोदय विद्यालय गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध या ठिकाणी हलविण्यात आले.
राज्यात १९९९ मध्ये भाजप सेना युतीचे शासन अस्तित्वात आले. युतीच्या शासनकाळात जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात भंडारा जिल्ह्यातील नवेगाव राष्टूीय उद्यान, नागझिरा अभयारण्य यासोबतच जवाहर नवोदय विद्यालय ही नवनिर्मित गोंदिया जिल्ह्याच्या वाट्याला गेले. त्यामुळे मागील १३ वर्षापासून भंडारा जिल्हा नवोदय विद्यालयापासून पोरका झालेला आहे.
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हे ही या नवोदय विद्यालयाला कारणीभूत ठरली आहे. तब्बल तेरा वर्षे लोटली. मात्र जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधींनी नवोदय विद्यालय आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे एकविण्यात आले नाही.

Web Title: Navodaya Vidyalaya without the district of Porca

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.