शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

मुरूमासाठी नैसर्गिक टेकडी उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

दावेझरी शिवारात नैसर्गिक टेकडी आहे. या टेकडीच्या एका बाजूला गिट्टी काढण्यासाठी परवानगी गत अनेक वर्षांपासून केली जात आहे. टेकडीच्या दुसऱ्या बाजूला गट क्रमांक २६२ मध्ये मुरूम उत्खननाची परवानगी महसूल प्रशासनाने दिली आहे. एक ते सात गटात उत्खननाची परवानगी असून प्रत्येक गटात केवळ ५०० ब्रास मुरूम उत्खनन करण्याची परवागनी आहे.

ठळक मुद्देदावेझरी येथील प्रकार : नियंत्रणाअभावी शासकीय मालमत्तेची लूट, पर्यावरणाचा ऱ्हास

मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रस्ता बांधकामासाठी लागणाऱ्या मुरूमाचे तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून आता कंत्राटदाराने नैसर्गिक टेकडी उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावला आहे. तालुक्यातील दावेझरी येथील नैसर्गिक टेकडी उद्ध्वस्त करून हजारो ब्रास मुरूमाची उत्खनन करण्यात आले. नियंत्रणाअभावी शासकीय मालमत्तेची लूट होत असताना यावर बोलायला कुणीही तयार नाही.
दावेझरी शिवारात नैसर्गिक टेकडी आहे. या टेकडीच्या एका बाजूला गिट्टी काढण्यासाठी परवानगी गत अनेक वर्षांपासून केली जात आहे. टेकडीच्या दुसऱ्या बाजूला गट क्रमांक २६२ मध्ये मुरूम उत्खननाची परवानगी महसूल प्रशासनाने दिली आहे. एक ते सात गटात उत्खननाची परवानगी असून प्रत्येक गटात केवळ ५०० ब्रास मुरूम उत्खनन करण्याची परवागनी आहे. ६ डिसेंबर ते २५ जानेवारी या कालावधीत सातही गटातून मुरूमाचे उत्खनन करण्याची परवानगी दिली होती. शिवालय कंट्रक्शन कंपनीच्या नावाने ही परवानगी दिलेली आहे.
मिटेवानी येथील गट क्रमांक ७६६ येथूनही ५०० ब्रास मुरूमाची परवानगी सदर कंपनीला देण्यात आली. या गटातूनही नियमबाह्य उत्खनन केले जात आहे.
दावेझरी शिवारात एक मोठी टेकडी असून या टेकडीवर प्राचीन अवलीयाची समाधी आहे. तेवढा भाग सोडला तर आता संपूर्ण टेकडी उउद्ध्वस्त करण्यात आली आहे. अतिशय उच्च दर्जाचा मुरूम असल्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले.
दावेझरी टेकडी ही शासनाच्या मालकीची आहे. विशेष म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना या प्रकाराकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही. सर्व नियम पायदळी तुडवून ५० पट अधिक मुरूमाचे उत्खनन करण्यात आले आहे.

चिंचोली-तुमसर रस्त्यावर मुरूम
दावेझरी व मिटेवानी येथील उत्खनन केलेला मुरूम चिंचोली ते तुमसर रस्ता बांधकामासाठी वापरण्यात आला आहे. रस्ता हायब्रिड असल्याने पॉवर नियंत्रण करणारी स्वतंत्र एजन्सी आहे. स्थानिक बांधकाम विभाग त्याला जबाबदार नाही. मे गॉड ही एजन्सी यावर नियंत्रण ठेवत असल्याची माहिती आहे. रस्त्यात किती मुरूम वापरला याची माहिती मिळाल्यास यातील अनियमितता पुढे येणार आहे.

दावेझरी-मिटेवानी येथे मुरूम उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे. ३५०० ब्रासपेक्षा जास्त मुरूमाचे उत्खनन झाल्यास चौकशी करण्यात येईल. अनियमितता आढळल्यास महसूल नियमानुसार कारवाई होईल.
-गजेंद्र बालपांडे, तहसीलदार.
चिंचोली-तुमसर दरम्यान रस्त्यावर किती मुरूमाचा वापर करण्यात आला. याची माहिती देण्यात येईल. सध्या मी बाहेर आहे. रस्त्याच्या मुरूमाचे रेकॉर्ड उपलब्ध आहे.
-राजेश खंडेलवाल, अभियंता मे गॉट एजन्सी.