पालडोंगरी येथे राष्ट्रवादी सक्षम बूथ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:37 IST2021-08-27T04:37:58+5:302021-08-27T04:37:58+5:30
राष्ट्रवादी पक्षाने कोरोना काळात जनतेची सेवा केली. औषधसाठा मुबलक साठा मिळवून दिला. ऑक्सिजनची व्यवस्था करून देण्यात आली. शेतकऱ्यांच्या धानाला ...

पालडोंगरी येथे राष्ट्रवादी सक्षम बूथ अभियान
राष्ट्रवादी पक्षाने कोरोना काळात जनतेची सेवा केली. औषधसाठा मुबलक साठा मिळवून दिला. ऑक्सिजनची व्यवस्था करून देण्यात आली. शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळवून दिला. अशा अनेक समस्यांवर काम केल्याचे त्यांनी सांगितले. मोहाडी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रवादी सक्षम बूथ अभियान सुरु करण्यात आला आहे. जिल्हा परिषद क्षेत्र, शहर, गावनिहाय बूथ आढावा सभा, बूथ निश्चित करणे अभियान समोर होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषद निवडणुका लक्षात घेऊन राबविण्यात येत आहे. गावागावांत राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी मोहाडी तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष शर्थीचे प्रयत्न करीत आहे. यात वरठी, पाचगाव, कांद्री, मुंढरी, करडी, डोंगरगाव, आंधलगाव, या क्षेत्रात राष्ट्रवादी सक्षम बूथ अभियान राबवून बूथ तेथे ६० टक्के युथ याप्रमाणे अभियान सुरु केले आहे.