शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर येथे राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST

प्रास्ताविक बहूजन प्रबोधन मंचचे अनिल कानेकर यांनी केले. याप्रसंगी डॉ. एस. एम. राजन यांनी ‘संविधान निर्मात्यांच्या अपेक्षा पुर्तीसाठी न्याय पालिकांचे प्रयत्न’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेत संविधान निर्मात्यांच्या अपेक्षा व्यक्त झालेल्या आहेत. विधानपालिका व कार्य पालिका योग्य काम करीत नसल्यास न्याय पालिका समोर येते.

ठळक मुद्देबहुजन प्रबोधन मंचचे आयोजन : मार्गदर्शन, कवी संमेलन, कीर्तनातून जनजागृती, गुणवंताचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : येथील बहूजन प्रबोधन मंचच्या वतीने कृष्णराव अर्जुनजी केडूसकर (आर्शिवाद मंगल कार्यालय) साहित्य परिसरात आयोजित १९ वे राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन उत्साहात पार पडले.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. एम. राजन होते. यावेळी अ‍ॅड. डॉ. कल्याणकुमार अ‍ॅड. रमन श्रीहरी चिमुरकर, स्वागताध्यक्ष भारती दिवटे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बहूजन प्रबोधन मंचचे अनिल कानेकर यांनी केले. याप्रसंगी डॉ. एस. एम. राजन यांनी ‘संविधान निर्मात्यांच्या अपेक्षा पुर्तीसाठी न्याय पालिकांचे प्रयत्न’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेत संविधान निर्मात्यांच्या अपेक्षा व्यक्त झालेल्या आहेत. विधानपालिका व कार्य पालिका योग्य काम करीत नसल्यास न्याय पालिका समोर येते. नागरिकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी न्याय पालिकांनी केलेले प्रयत्न अनेक उदाहरणानी समजावून सांगितले.
सामाजिक आणि आर्थिक उद्देशांच्या पुर्तीसाठी नागरिकांनी संविधानिक मार्गानेच लढा द्यावा असे आवाहन केले. यावेळी डॉ. रिता राऊत, डॉ. सुधिर मस्के, डॉ. प्रवीण अबगड, गजेंद्र गजभिये, जी. एस. कान्हेकर, प्रा. वासंती सरदार, सी. एम. बागडे, राजेश तिरपुडे, दिनेश राऊत, सरिता जनबंधू, दोपेश्वर मेश्राम, मेघा आंबुलकर, अजीत वैद्य, नितेशकुमार भैसारे, अश्विन रामटेके, प्यारेलाल लोणारे यांचा स्मृतीचिन्ह, भारताचे संविधान देवून सत्कार करण्यात आला.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात धनंजय मुळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात आले. यात संध्या कानेकर, नंदा कुटे, अल्का खोब्रागडे, जयश्री गणवीर, सुप्रिया उके, अस्मिता नंदागवळी, ममता राऊत, भुवनेश्वरी परशुरामकर, दौलतभाई पठाण, अशोक भजने, प्रणय पिल्लेवान, पंकज बावनकुळे, यशवंत सिम्पोलकर, ललीत तिरपुडे या नवोदित कवींनी कविता सादर करुन श्रोत्यांची वाहवा मिळविली.
तिसºया सत्रात सप्तखंजरीवादक आकाश ताले आणि त्यांच्या संचाने समाजप्रबोधन र्कीतन सादर केले. कीर्तनातून त्यांनी व्यसनानिधता, अंधश्रध्दा, भ्रष्टाचार, ग्रामस्वच्छता अशा विविध मुद्यांवर जनजागृती केली. संचालन बहुजन विद्यार्थी संघाचे संघटक हितेंद्र रामटेके, आभार प्रदर्शन प्रदीप भावे यांनी केले. संमेलनासाठी बहुजन विद्यार्थी संघ लाखांदूर, नागपूर यांनी सहकार्य केले.