नाक्याचे ‘बॅरियर’ गायब

By Admin | Updated: March 10, 2016 00:47 IST2016-03-10T00:47:06+5:302016-03-10T00:47:06+5:30

तुमसर-वारासिवनी आंतरराज्यीय मार्गावर तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत हरदोली तपासणी नाका मागील अनेक महिन्यांपासून मोकाट आहे.

The nasal 'barrier' disappeared | नाक्याचे ‘बॅरियर’ गायब

नाक्याचे ‘बॅरियर’ गायब

हरदोली येथील प्रकार : वाहनांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह
मोहन भोयर तुमसर
तुमसर-वारासिवनी आंतरराज्यीय मार्गावर तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत हरदोली तपासणी नाका मागील अनेक महिन्यांपासून मोकाट आहे. येथील बॅरियर (अडवणूक खांब) कार्यालयाशेजारी जंगलेल्या स्थितीत पडून आहे. येथील वनक्षेत्र सहायकांचे कार्यालयाची वास्तू शेवटची घटका मोजत आहे.
कागदी दस्ताऐवज कुजलेल्या स्थितीत आहे. तुमसर मुख्यालय केवळ पाच कि.मी. अंतरावर असूनही वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांचे येथे लक्ष दिसत नाही. उर्वरित जंगलाचे रक्षण करण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होतो.
तुमसर-वारासिवनी या आंतरराज्यीय महामार्गावर हरदोली येथे वनविभागाचे तपासणी नाका आहे. या तपासणी नाका व क्षेत्राकरिता एक वनक्षेत्र सहाय्यक तपासणी नाका कर्मचारी तीन, बीट गार्ड पाच वनमजूर चार स्थायी, एक अस्थायी अशी कर्मचाऱ्यांची फौज आहे. मध्य प्रदेशला जोडणारा हा महामार्ग आहे. रस्त्यावर बॅरियर (अडवणूक खांब) असणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय वाहनांची तपासणी करता येणे शक्य नाही. वाहने थांब्याकरिता बॅरीअर लावण्यात येते. येथील बॅरियर तुटल्यावर त्याला कार्यालयाशेजारी ठेवण्यात आले आहे. जमिनीवर ठेवल्याने त्याची दुर्दशा होऊन जंगलेल्या स्थितीत ते आले आहे. परंतु वनविभागाने त्यास दुरुस्त करण्याची तसदी घेतली नाही. मागील अनेक महिन्यांपासून ही स्थिती येथे आहे.
निश्चितच येथे वाहनांची तपासणी होते काय, असा प्रश्न उपस्थित होतो. या तपासणी नाक्यावर कर्मचारीसुद्धा कर्तव्यावर सहसा दिसत नाही.
तपासणी नाकासुद्धा मोडकळीस आला आहे. इमारत जर्जर झाली आहे. तपासणी नाक्याच्या मागेच कौलारू वनक्षेत्र सहायकांचे कार्यालय आहे. कार्यालयाला लाकडी दांड्याची मदत घ्यावी लागत आहे. छतावरील कौले फुटलेली आहेत. वनकर्मचाऱ्यांच्या कार्यालयाच्या खोलीतून आभाळाचे दर्शन होते. एका रॅकवर वनविभागाचे अत्यंत महत्वपूर्ण दस्तऐवज ठेवले आहे. दस्तऐवज कुजलेल्या स्थितीत येऊन पोहोचले आहे. येथील दस्तऐवज सुरक्षित नाही. येथील वनक्षेत्र सहायक मात्र मुख्यालयी राहतात.
वनविभागाचा कारभार मात्र येथे वाऱ्यावर दिसतो. तुमसर मुख्यालयापासून केवळ पाच किलोमीटरवर हा तपासणी नाका असूनही या तपासणी नाक्याकडे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसत आहे. हा तपासणी नाका महत्वपूर्ण असून येथे २४ तास सुसज्ज यंत्रणा उभारण्याची गरज आहे.

Web Title: The nasal 'barrier' disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.