शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भंडारातील पूर बाधितांच्या बचावासाठी नाना पटोले मैदानात; तातडीने मदत देण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 18:01 IST

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले लाखांदुर तालुक्यात भेटीला

भंडारा: भंडारा जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टीमुळे आणि पाण्याच्या पातळीत होत असलेली वाढ यामुळे विविध ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही पूर परिस्थितीचा फटका मोठ्या प्रमाणात बसतो आहे. आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे लाखांदुर तालुक्यात दौऱ्यावर असुन त्यांनी लाखांदूर तालुक्यातील खैरना, मोहरना गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी केली व पूरबाधित लोकांना योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना देऊन अन्य  लोकांनाही तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. 

गेल्या काही दिवसापासुन जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला. शेतीतील पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे निर्देश पटोले यांनी दिले असुन पूर बाधित गावांना मदत व बचाव कार्याचा पटोले यांनी आज आढावा घेतला. पूर बाधितांना तातडीने मदत देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीसोबतच घरांचे व पशुधनाचे नुकसान झाले आहे. काही घरांचे अंशतः तर काही घरांचे पूर्णतः नुकसान झाले. अनेक गोठयांचे सुद्धा नुकसान झाले आहे. घरांच्या नुकसान भरपाईसाठी तसेच गोठयांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. 

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकरी व गावांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश पटोले यांनी दिले. पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या. सर्व ठिकाणी विज पुरवठा सुरु कसा ठेवता येईल यादृष्टीने देखील विज वितरण विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे बाधित एकही व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये असेही त्यांनी सांगितले. 

 प्रशासनाने सतर्क राहावे-

 नद्यांना पूर आल्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊन विसर्ग सुरू आहे. पाण्याच्या विसर्गामुळे भंडारा जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना धोका होऊ शकतो, ही परिस्थिती लक्षात घेता राज्य आपत्ती प्रतिसाद दल व जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे, तसेच पुरामुळे विविध प्रकारचे आजार देखील वाढू शकतात त्यादृष्टीने आरोग्य विभागाने देखील तयार राहावे अशा सूचना त्यांनी दिल्या. संभाव्य धोका असणाऱ्या गावात तातडीने मदत पोहोचवण्याचे नियोजन करावे आणि आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करण्यासाठी असलेले सर्व संपर्क क्रमांक देखील 24 तास सुरू ठेवण्यात यावे असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेfloodपूरMaharashtraमहाराष्ट्र