शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR vs SRH Final : आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स
2
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
3
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
4
डबलिनला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
5
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
6
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
7
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
8
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर सबसिडी नावापुरतीच, ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 5:00 AM

दशकभराच्या तुलनेत गॅस सिलींडरच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. साधारणतः दहा वर्षांपूर्वी चारशे रुपयांना मिळणारा सिलेंडर आता सहाशे ते सातशे या दरामध्ये उपलब्ध होत आहे. विशेषतः सबसिडी मधील फरक हा जिल्हानिहाय कमी जास्त आहे. डिसेंबर महिन्यात ७०५ रुपयांना गॅस सिलिंडर उपलब्ध झाला आहे. त्या वरील सबसिडी ही १२५ रुपये असली तरी गरिबांना मिळणारा सिलेंडर मात्र परवडणारा नाही.

ठळक मुद्देसर्वांचेच दुर्लक्ष : सामान्य माणसांचे हाेताहेत हाल

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडी दर महिन्याला कमी कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. याला बरीच तांत्रिक बाबी अंतर्भूत असल्या तरी याचा फटका मात्र गोरगरीब नागरिकांना बसत आहे. या महिन्यात केवळ ९३ रुपये सबसिडी मिळणार असली तरी घरपोच डिलिव्हरीचा ही फटका ग्राहकांना बसत आहे.दशकभराच्या तुलनेत गॅस सिलींडरच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. साधारणतः दहा वर्षांपूर्वी चारशे रुपयांना मिळणारा सिलेंडर आता सहाशे ते सातशे या दरामध्ये उपलब्ध होत आहे. विशेषतः सबसिडी मधील फरक हा जिल्हानिहाय कमी जास्त आहे. डिसेंबर महिन्यात ७०५ रुपयांना गॅस सिलिंडर उपलब्ध झाला आहे. त्या वरील सबसिडी ही १२५ रुपये असली तरी गरिबांना मिळणारा सिलेंडर मात्र परवडणारा नाही. गरिबांना वाढलेला दराचा चांगलाच फटका बसत आहे. सद्यस्थितीत भंडारा जिल्ह्यात २ लाख ९५ हजार ८४३ गॅस सिलेंडरधारक असून जिल्ह्यात २२ गॅस वितरकधारक आहेत. खात्यात लिंक असलेल्या  लाभार्थ्यांना सबसिडी मिळत असली तरी त्याचा फायदा नगन्य आहे.  डिसेंबर महिन्यात सिलिंडरचे दर वाढले असले तरी सबसिडी मात्र १०० रुपयांच्या आत असल्याचे दिसत आहे.

घरपाेच डिलीव्हरीसाठी माेजली जाते अतिरिक्त रक्कम सिलेंडरची किंमत वरिष्ठ पातळीवर निर्धारित केली जाते. यात ग्राहकांच्या घरापर्यंत सदर सिलेंडर पोहोचण्यास इतपत रकमेचा ही त्यात समावेश असतो. परंतु तसे होत नाही. घरपोच सिलेंडर करणारे अतिरिक्त रक्कम मागतात. ही रक्कम १० ते ४० रुपयांपर्यंत अतिरिक्त असते. याचा भुर्दंड  गॅस धारकांना बसतो. ग्रामीण भागात हा प्रकार सर्रास पाहायला मिळतो वाढत्या दराच्या फटका बसत असतो. दशकभरापूर्वी अल्प दरात मिळणारा सिलिंडर आता चांगलाच महाग झाला आहे. सबसिडी कमी-कमी होत जात असताना सिलिंडर पूर्ण भावाने मिळत असल्याचे जाणवते. मग अशा सबसिडीचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित हाेते.- आनंदराव कुंभारे, ग्राहक

कोरोना काळात सबसिडी मिळालीच नाही. सबसिडी मिळत असली तरी ती खूप अल्प असते. सरकार नावापुरतीच ही रक्कम खात्यात वळती करीत असेल त्याला काही महत्व नाही. ही शुध्द फसवणूक आहे, असेच म्हणावे लागेल. याकडे शासनाने गांभिर्यपूर्वक निणर्य घेणे आवश्यक आहे. - अश्विन साखरे, ग्राहक

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर