देव्हाडी उड्डाणपुलाला बाळासाहेबांचे नाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:35 IST2021-04-25T04:35:03+5:302021-04-25T04:35:03+5:30

मनसर-रामटेक-तुमसर-तिरोडा-गोंदिया राज्यमार्ग २४९ असून येथे रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम गत पाच वर्षांपासून सुरू आहे. सदर उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. बाळासाहेब ...

Name the Devhadi flyover after Balasaheb | देव्हाडी उड्डाणपुलाला बाळासाहेबांचे नाव द्या

देव्हाडी उड्डाणपुलाला बाळासाहेबांचे नाव द्या

मनसर-रामटेक-तुमसर-तिरोडा-गोंदिया राज्यमार्ग २४९ असून येथे रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम गत पाच वर्षांपासून सुरू आहे. सदर उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहे. कोरोनाच्या कठीण काळातही राज्याच्या विकासाच्या गाडीचा वेग मंदावू न देण्याची दक्षता घेण्यात आली. महाराष्ट्रात विविध विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत, राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रातील योगदान बहुमूल्य आहे. त्यामुळे अशा उत्तुंग नेत्याचे नाव रेल्वे उड्डाणपुलाला देणे हा त्या वास्तूचा गौरव करण्यासारखे आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे. यासंदर्भात राज्य शासनास तशी शिफारस करण्यात यावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक विभाग नागपूरचे मुख्य अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, जिल्हा संपर्क मंत्री यांना पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना शिवसेनेचे विभागप्रमुख अमित एच. मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Name the Devhadi flyover after Balasaheb